शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:32 IST

मंगळवारी रात्री तुमसर शहरासह देव्हाडी, खापा, मांगली, तामसवाडी, हसारा आदी गावात गारांचा पाऊस पडला. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह सुसाट वाºयासह गारांचा वर्षाव झाला.

ठळक मुद्देगारांचा आकार मोठा : जीवीतहानी टळली, अनेक वाहनांच्या काचा फुटल्या

आॅनलाईन लोकमततुमसर : मंगळवारी रात्री तुमसर शहरासह देव्हाडी, खापा, मांगली, तामसवाडी, हसारा आदी गावात गारांचा पाऊस पडला. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह सुसाट वाºयासह गारांचा वर्षाव झाला. प्रथम नागरिकांना काहीच कळले नाही. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी बाहेर पडून दृष्य बघितले. अनेक वाहनांच्या काचा फुटल्या, नशीब बलवत्तर म्हणून गायमुख यात्रा परिसरात केवळ पाऊस पडला. गारा पडल्या नाही. येथे मोठा अनर्थ टळला.मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले. अचानक सुसाट वारा सुरु झाला. आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरु झाला नाही. काही क्षणात गारांचा पाऊस सुरु झाला. अतिशय वेगाने बर्फाचा वर्षाव नागरिकांनी ‘याची देही याचा डोळा’ बघितला. हौस म्हणून तरूण व बच्चे कंपनीने गारा हातात, भांड्यात गोळा केल्या. गारांचा आकार मोठा असल्याने गारा तीन ते चार तास विरघळल्या नाही. रस्त्यावरील वाहने जागीच थांबली होती. नागरिक सुरक्षित स्थळी थांबले. काही क्षण काय घडत आहे त्याचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अशा गारा २५ वर्षापूर्वी पडल्या होत्या, अशी माहिती तुमसर शहरातील वयोवृद्ध नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तुमसर शहरातील शहर वॉर्डात, गोवर्धन नगर, बोस नगर, इंदिरा नगरासह संपूर्ण शहरात गारांचा वर्षाव झाला. एका कौलारू घराला तडे गेले. गायमुख यात्रा परिसरात पाऊस पडला. गारांचा वर्षाव झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.तुमसर शहरासह नजीकच्या गावात गारांचा वर्षाव झाला. या संबंधात माहिती घेणे सुरु आहे. पिकाचे नुकसानीची माहिती गोळा करणे सुरू आहे.-गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.