शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फेरमतदानातील सर्वच ईव्हीएम ‘आॅल ईज वेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:43 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.

ठळक मुद्दे४८.८५ टक्के झाले फेरमतदान : एकाही ठिकाणी बिघाड नाही

नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, मंगळवारला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही मतदान केंद्रांवर फेरमतदासाठी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यांतर ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार बुधवारला घेण्यात आलेल्या ४९ मतदान केंद्रातील कोणत्याही ईव्हीएमध्ये बिघाड आला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वच ईव्हीएम ‘आॅल ईज वेल’ असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारला शेकडो ईव्हीएममध्ये बिघाड का आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.या पोटनिवडणुकीसाठी गुजरात राज्यातील सुरत येथून ईव्हीएम मागविण्यात आले होते. याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेतला होता. कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या ईव्हीएमची गरज असते त्यापैकी १० टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे सांगून या निर्देशांनुसार ईव्हीएमची तपासणी करण्याची मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना केली होती. परंतु अखेरपर्यंत या ईव्हीएमची तपासणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर २८ मे रोजी मतदानाच्या दिवशी या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाचा प्रकार समोर आला. त्यानंतर खा.पटेल यांनी फेरमतदान घेण्याची मागणी करून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली.त्यामुळे फेरमतदानासाठी निवडणूक प्रशासनाने आयोगाकडे ईव्हीएमची मागणी केली. त्यानंतर आयोगाने महाराष्ट्रातील सांगली व मध्यप्रदेशातील कांकेर येथून ईव्हीएम पाठविले. हेच ईव्हीएम बुधवारला ४९ मतदान केंद्रावर फेरमतदानासाठी पाठविण्यात आले. त्यापूर्वी गुजरातहून आणलेल्या ईव्हीएम मुख्यालयात जमा करून ठेवलेल्या आहेत. दरम्यान, मंगळवारला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तातडीने रूजू झालेल्या कादंबरी बलकवडे या संपूर्ण मतदान केंद्रांवर लक्ष ठेऊन होत्या. गुरूवारला त्यांच्याच मार्गदर्शनात मतमोजणी होणार आहे.