शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेतीतस्कर झाले पुन्हा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपूर्वी वडेगाव रेतीघाटावर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने धाड घालून रेतीसह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. आता कारवाईचा बडगा शांत झाल्यानंतर रेतीतस्कर पुन्हा अलर्ट झाले आहेत. चाेरी-छुप्या मार्गाने रेतीचा अवैध व्यवसाय सुरू झाला आहे. साेन्यासारख्या रेतीची सुरक्षा करणारा कुणी वाली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले केले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून यांपैकी कुणाचाही जीव गेला नाही. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीने आतापर्यंत अनेक निष्पाप लाेकांना बळी गेला आहे.एसडीओंवरील हल्ल्याची घटना ताजीच आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मुख्य नेतृत्वात माेठी धाडसी कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही रेतीतस्करी सुरू हाेती, हे या धाडसी कारवाईचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल; परंतु ही फक्त एका रेतीघाटाची कारवाई हाेती. जिल्ह्यात एकेकाळी ९० पेक्षा जास्त रेतीघाट हाेते. ती संख्या राेडावून आता ५० च्या जवळपास आली आहे. फक्त गतवर्षीच्या शासकीय नाेंदीवर नजर घातल्यास १४ रेतीघाटांचे लिलाव झाले हाेते. काेराेनाकाळात झालेली तूटही रेतीमाफियांनी या चार महिन्यांत काढली असावी, एवढी लूट केली आहे.शासकीय संपत्तीची ही खुलेआम लूट करण्यामागे राजकीय पाेशिंदेही मागे नाहीत. रेतीतस्कर सैराट तर अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कारवाई संदर्भातच भीतीचे वातावरण आहे. सेटिंगचा मामला टाॅप टू बाॅटम परफेक्ट असला तरी इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही, असा संदेशही रेतीतस्कर हल्ल्यातून देत आहेत.

रेती घाटांचा लिलाव कधी?- हवे असलेले दर रेती घाटांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक घाटांचा लिलाव गतवर्षी झाला नाही. यावर विभागीय स्तरावरुन मार्गदर्शनही मागविण्यात आले हाेते. आता तस्करांसाठी रान माेकाट करण्यापेक्षा रेतीघाटांचा लिलावतरी करावा अशी जनसामान्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी