शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला

By admin | Updated: July 27, 2015 00:50 IST

येत्या ६ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

अर्जासाठी फिल्डींग : निवडणुकीला ना आचारसंहितेचे बंधन, ना खर्चाची मर्यादालाखनी : येत्या ६ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जासाठी फिल्डींग लावणे सुरू केले आहे. काहींना आपल्या उमेदवारीची शाश्वती आहे. तर काही आपल्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत.लाखनी बाजार समितीच्या निवडणूकीची अधिसूचना जाहीर होताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची तारीख ६ सप्टेंबर निश्चित केली. या तारखेला गोपाळकाला उत्सव येत असल्याने शेतकऱ्यांशी निगडित सण आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीला ना आचारसंहितेचे बंधन ना खर्चाची मर्यादा. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. या बाजार समितीच्या निवडणूकीत २,४८४ मतदार आपला हक्क बजावून १९ संचालक निवडणार आहेत. बाजार समितीची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ नियम १९६७ नुसार घेण्यात येते. सहकार कायद्याचे नियम यास लागू होत नाही. सहकार क्षेत्रात वावरणारे दिग्गज नेते या निवडणुकीत सहभागी होत असले तरी बाजार समितीचे नियम व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीला आचारसंहिता व खर्चाचे बंधन लागू होत नाही. त्यामुळे धनदांडग्या व वजनदार व्यक्तींना ही निवडणूक खूपच सोपी आहे.सहकारी संस्थांच्या निवडणूका सहकार कायद्यानुसार होतात. त्याकरिता सहकार आयुक्त व त्यांच्या निर्देशानुसार निवडणूक घेणे बंधनकारक असतात. त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे बंधन असते. मात्र, बाजार समित्या या समिती कायद्याखाली पंजीबद्ध असल्याने या निवडणूकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे खर्चाचे विवरण देणे हे देखील उमेदवारांना बंधनकारक राहत नाही. सहकार क्षेत्रातील कोणत्याही संस्थांना उलाढालीपेक्षा बाजार समित्याचा लेखा-जोखा मोठा असतो. त्यामुळे समिती निवडणूकीकरीता नेत्यांना आकर्षण अधिक असते. साहजीकच या निवडणूका साधारण वातावरणात होवू शकत नाही. आचारसंहिता व निवडणूक खर्चाची बाब सोडली तर निवडणूकीतील नियमाप्रमाणे सर्वच घरातील उमेदवार संचालक पदाकरिता निवडणूक लढवू शकतात. २,४८४ मतदार निवडणार संचालकसेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यात सर्वसाधारण-७, महिला २, इतरमागास १, विमुक्त भटक्या जाती-जमाती १ यात एकूण १,२०४ मतदार आहेत. ग्राम पंचायत मतदार संघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जमाती १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल १ असे चार उमेदवार देण्याची जबाबदारी या मतदार संघातील १,०८० मतदारांवर आहे. ११६ मतदार व्यापारी अडते मतदार संघातून २ संचालक तर १० मतदार हमाल-व्यापारी मतदारसंघातून १ संचालक निवडून देणार आहेत. बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगनादेशभंडारा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असला तरी ज्या बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला नाही, अशा बाजार समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निवडणुका आता सहामहिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होणार आहेत. सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १४(३)(ए) च्या तरतुदीनुसार टंचाईदुष्काळ, पूर, आग किंवा इतर कोणत्याही आपत्तीमुळे राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा अथवा एखाद्या प्राधिकरणाचा कोणताही निवडणूक कार्यक्रम एकाचवेळी आल्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. बाजार समिती निवडणुकीसंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात निश्चित आदेश दिले आहेत. ज्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कृषी पणन नियम १९६७ च्या नियम ४३(१) खाली निवडणुकीसंदर्भात आदेश काढले आहेत.