शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

बावनथडी नदीपात्रात शेती गडप

By admin | Updated: December 3, 2014 22:44 IST

बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप : नुकसानभरपाई देण्याची शासनाकडे मागणीचुल्हाड (सिहोरा) : बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.अडीच हजार लोकवस्ती असलेल्या बपेरा गावात बहुतांश शेतकरी आहेत. बावनथडी नदी काठावर शेतकऱ्यांची बागायती शेती आहे. या शेतकऱ्यांना नदीचे वाढते पात्र कर्दनकाळ ठरत आहे. या नदीच्या पात्राने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागांची विभागणी केली आहे. आधी नाला स्वरूपात असलेला पात्राने नदीचे विशाल रूप घेतले आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेने वाढत आहे. या वाढत्या पात्रात गावातील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. यात २० हुन अधिक विहीरी भुईसपाट झालेल्या आहेत. नदी काठालगत या विहिरीचे अवशेष आजही साक्ष देत आहे. गावातील शेतकऱ्यांवर वाढत्या पात्राने संकट ओढवले आहे. नदी पात्रात शेती समाविष्ठ झाल्याने अनेक शेतकरी शेतमजूर झालेली आहे. तर अनेकांना भूमिहीन होण्याची पाळी आली आहे. यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी गावही सोडले आहेत. वडिलोपार्जीत शेती नदी पात्रात गिळंकृत झाल्याचे दु:ख गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात राजकारण झाले आहे. तत्कालीन पालकमंत्री बंडू सावरबांधे यांनी गावातील शेतकऱ्यांना विहीरी देणार असल्याचे सांगितले होते. परंतु या विहीरी आजवर शेतकऱ्यांच्या शेतात पोहचल्या नाहीत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी गावाला भेट दिली होती. परंतु शेतकऱ्यांना मदत वाटपाचा पॅकेज दिला नाही. त्यांनी गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले. १२५ कुटूंबियाचे पुनर्वसन झाले आहे. (वार्ताहर)