शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांचे आंदोलन

By admin | Updated: June 22, 2017 00:28 IST

राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे.

विविध मागण्या : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी सहायकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. यात जिल्ह्यातील सुमारे १३० कृषी सहायक सहभागी झाले होते.स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाचे स्थापना करुन कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल याबाबद अद्यापही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. मृद व जलसंधारण विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकाची सर्वच पदे आपल्याकडे घेतली आहे. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकांना पदोन्नतीचे पद राहणार नाही. सोबत कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे मृद व जलसंधारण विभागाकडे मर्ग केल्याने कर्मचाऱ्यावर अन्याय होणार आहे.याबाबींचा विचार करुन कृषी विभागाची सुधारित आकृतीबंध तयार करणे गरजेचे आहे. मात्र ते करण्यास प्रशासनाने पुढाकार अद्याप घेतलेला नाही. या मागणीसह कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करावा. या आकृतीबंधमध्ये कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी असे करावे, कृषी पर्यवेक्षकांची पदे कृषी सहायकांमधून पदोन्नतीने भरावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने १२ जूनपासून विविध प्रकारचे आंदोलन करुन शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणात सुमारे १३० कृषी सहायक सहभागी झाले होते. कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे खोळंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंदोलन कर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात आनंद मोहतुरे, गिरीश रणदिवे, गोपाल मेश्राम, भगरित सपाटे, श्रीकांत सपाटे, राजेंद्र खंडीईत, भास्कर सोनवाने, प्रशांत भोयर आदींचा समावेश होता.