शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्षे ७४, पण आयुष्यात एकदाही वाहनाने प्रवास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी आई-वडिलांना मदत करणे सुरू केले. कधी शेतात तर कधी माेलमजुरीचे काम करू लागले. लहान वयात उन्हाळ्यात दरराेज जंगलात २० ते २५ किमी भटकंती करून डिंक गाेळा करायचे. पावसाळ्यात रानभाज्या गाेळा करण्याचे नित्याचे काम झाले हाेते. परिस्थितीमुळे कधी सायकललाही त्यांचा लहानपणी स्पर्श झाला नाही. वय वाढत गेले. लग्न झाले. मुले झाली, परंतु पायी चालण्याची सवय मात्र तुटू दिली नाही. 

ठळक मुद्देवेगवान युगात अजब व्यक्तिमत्त्व : कुठेही जायचे असेल तर पायी वारी

दयाल भाेवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : वेगवान युगात वाहनाशिवाय घराबाहेर पडणेही कठीण. कुठेही जायचे असेल तर दुचाकी, चारचाकी वाहनाचा आधार हवाच. माेठ्या प्रवासासाठी रेल्वे आणि विमानसेवाही आहे. परंतु अख्ख्या आयुष्यात कुणी वाहनात पायच ठेवला नाही असे सांगितले तर आश्चर्य वाटेल ना! मात्र हे खरे आहे. लाखांदूर तालुक्यातील ७४ वर्षीय आनंदराव खाेब्रागडे यांनी आजपर्यंत कधीही वाहनाने प्रवास केला नाही. कुठेही जायचे असले की त्यांची पायी वारी ठरलेली असते. हीच त्यांची परिसरात ओळख आहे.  वेगवान युगातील आनंदराव म्हणजे अजब व्यक्तिमत्त्वच म्हणावे लागेल. लाखांदूर तालुक्यातील साेनी गावात आनंदराव यांचा जन्म झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी कुटुंबाचा गाडा हाकीत त्यांना माेठे केले. समज येताच परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी आई-वडिलांना मदत करणे सुरू केले. कधी शेतात तर कधी माेलमजुरीचे काम करू लागले. लहान वयात उन्हाळ्यात दरराेज जंगलात २० ते २५ किमी भटकंती करून डिंक गाेळा करायचे. पावसाळ्यात रानभाज्या गाेळा करण्याचे नित्याचे काम झाले हाेते. परिस्थितीमुळे कधी सायकललाही त्यांचा लहानपणी स्पर्श झाला नाही. वय वाढत गेले. लग्न झाले. मुले झाली, परंतु पायी चालण्याची सवय मात्र तुटू दिली नाही. आजही कुठेही जायचे असले की आपली पायी वारी ठरलेली असते. परिसरात त्यांना पैदल वारी म्हणूनच ओळखले जाते. वयाच्या ७५व्या वर्षातही ते दरराेज ३० ते ४० किमी पायी चालत असतात. असे हे आनंदराव तरुणांसाठी प्रेरणा आहे.     

एसटीच्या सवलतीचाही फायदा नाही- राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाची सवलत दिली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सवलत पासही आहे. परंतु या सवलतीचाही कधी फायदा घेतला नाही. गुरुवारी ते साेनी या आपल्या गावाहून ९ किमी लाखांदूर येथे तहसीलच्या ठिकाणी आले. तहसीलमधील काम आटाेपून पुन्हा ९ किमी पायीच गेले. यांत्रिकीकरणाच्या युगात हा झपाटलेला माणूस रस्त्याने झपाझप चालताना लाखांदूर तालुक्यात दिसून येताे. 

तंदुरुस्त आराेग्याचे रहस्यदरराेज नियमित २० ते ३० किमी या वयातही आनंदराव पायीच चालतात. त्यामुळे आजपर्यंत त्यांना काेणत्या आजाराने स्पर्शही केला नाही. रक्तदाब, रक्तशर्करा किंवा इतर कुठल्याही आजाराची बाधा झाली नाही. ठणठणीत प्रकृती आहे. यामागचे रहस्य म्हणजे पायी चालणे असल्याचे आनंदराव अभिमानाने सांगतात.

 

टॅग्स :Healthआरोग्य