लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बपेरा येथील पशु दवाखान्याचा कारभार गत अनेक वर्षापासून समाजमंदिरातून होत आहे. येथूनच जनावरांना लसीकरण, औषधोपचार करण्यात येत आहे. यामुळे आजही या दवाखान्याचा वनवास संपला नाही.आंतरराज्यीय सिमेवर असणाऱ्या बपेरा गावात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत श्रेणी-१ चा पशु दवाखाना मंजुर कण्यात आला आहे. गत अनेक वर्षापासून समाजमंदिरात पशु दवाखान्याचे अतिक्रमण आहे. या दवाखान्यात साधी बैठकीची व्यवस्था नाही. याशिवाय प्रशासकीय कामकाज करताना अडचणीचे ठरत आहे. दवाखान्यात लसीकरणाचे औषधी सुरक्षीत ठेवताना कार्यरत कर्मचाºयाची धांदल आहे.या पशु दवाखान्याला बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील सुकळी नकुल, गोंडीटोला, बपेरा, बिनाखी, वारपिंडकेपार, महालगाव, ब्राम्हणटोला, देवसर्रा, सोंड्या गावे जोडण्यात आली आहेत. या गावात गत पशुगणनेनुसार देशी गाय, संकरीत गाय, म्हैस, शेळ्या, कोबड्या असे सहा हजार ७०५ अशी नोंद करण्यात आली आहे.जनावरांना लसीकरण, औषधोपचार करण्याची जबाबदारी याच पशु दवाखान्याच्या यंत्रणेवर आहे. याशिवाय शिबिर आणि मेळावे आयोजित करण्यात येत असताना सुविधा नगण्य आहेत. पशु दवाखान्याचे इमारत बांधकाम करण्यात आले नाही. गावात जागेची अडचण आहे. कधी बुडीत तर कधी रेड झोन जागेत इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे वारंवार बांधकामाचा प्रस्ताव नाकारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुर्नवसीत जागेत प्रस्ताव सादर करण्याकरिता पुढाकार घेण्यात आला असता विरोध झाला आहे. यामुळे गावात आता जागा उपलब्ध नाही. इमारत बांधकाम झाले नाही. याच गावाशेजारी देवसर्रा गावाची सिमा आहे. या गावाचे हद्दीत पशुदवाखाना बांधकाम मंजुर करण्याचे प्रयत्न झाले नाही. जनावरांचे जतन आणि संवर्धन संदर्भात यंत्रणा गंभीर नाही. बपेरा बसस्थानक परिसरात जागा उपलब्ध असताना या दिशेने एक पाऊल पुढे ठेवण्यात येत नाही. यामुळे शेतकºयाचे पशुपालन व्यवसायाला वैद्यकीय सहकार्य मिळत नसल्याने जनावराचे संख्येत घट होत आहे.चुल्हाड येथील गोपालक संकटातराज्य शासनाचे अखत्यारीत असणाऱ्या चुल्हाडच्या पशु दवाखान्यात विदारक चित्र आहे. या दवाखान्यात पशुचिकित्सक, इमारत, टेबल आणि खुर्च्या नाहीत. या दवाखान्याचा प्रभार देण्यात येत आहे. आठ हजार जनावरांना लसीकरणाचे वांदे आहेत. या दवाखान्यात एक ना धड, भाराभर चिंद्या असे चित्र असताना लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. यामुळे संताप आहे. समस्या निकाली काढण्याची मागणी आहे.बपेरा आणि चुल्हाड गावातील पशु दवाखान्याचा विषय गंभीर आहे. जनावरांना औषधोपचार करताना अडचणीचे ठरत आहेत. समस्या सोडविण्याकरिता आंदोलन करण्यात येईल.-किशोर राहांगडाले,सामाजिक कार्यकर्ता, बिनाखी.