शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतर प्रत्येकांनी सेवाप्रवृत्त व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:56 IST

वैदर्भिय सांस्कृतिक इतिहासाचा वारसा जपण्यासाठी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केलेले कार्य निश्चित उल्लेखनीय आहे.

ठळक मुद्देश्रीपाद जोशी : गुरुप्रसाद पाखमोडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

आॅनलाईन लोकमतभंडारा : वैदर्भिय सांस्कृतिक इतिहासाचा वारसा जपण्यासाठी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केलेले कार्य निश्चित उल्लेखनीय आहे. हा त्यांच्या सेवाप्रवृत्तीचा सत्कार आहे. डॉ.पाखमोडे यांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लोकहिताच्या कार्यात सेवाप्रवृत्त व्हावे, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पाखमोडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मंगलमय सभागृह येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे होते. याप्रसंगी मराठी संत साहित्याचे ख्यातनाम संशोधक डॉ.म.रा.जोशी, विसासंघाचे उपाध्यक्ष डॉ.राजन जयस्वाल, डॉ. सत्यवान मेश्राम आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.म.रा. जोशी यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.पाखमोडे, शुभदा पाखमोडे यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजन जयस्वाल यांनी डॉ. पाखमोडे यांच्या कुशल प्रशासनाची व कार्यतत्परतेची ओळख देत त्यांना निरोगी दीर्घायुष्याची कामना केली. डॉ.सत्यवान मेश्राम यांनी डॉ.पाखमोडे यांच्या संशोधन कार्याच्या व वैशिष्ट्यांचा उल्लेख केला.याप्रसंगी डॉ. पाखमोडे यांनी सत्काराला उत्तर देताना यानंतर उर्वरीत आयुष्य हे साहित्य सेवेत घालविण्याचे मनोदय व्यक्त करून आयुष्यात ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणात डॉ.श्रीपाद जोशी यांनी भंडारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीच्या योगदानाचा उल्लेख करून भंडारा जिल्ह्यातील डॉ.हरिश्चंद्र बोरकर, द.सा. बोरकर यांच्यासोबतच डॉ.पाखमोडे यांचे कार्य खूप मोठे आहे, असे सांगितले.याप्रसंगी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांचा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने डॉ.अनिल नितनवरे यांनी प्रगती महिला समाज संस्थेच्या रेखा देशकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे डॉ. हरिश्चंद्र बोरकर, बंडोपंत बोढेकर, हिरामण लांजे, युगसंवाद संस्थेचे सचिव प्रा.नरेश आंबीलकर, डॉ.सुरेश खोब्रागडे, बासप्पा फाये, संस्कार भारतीचे प्रा.सुमंत देशपांडे, योगीता देशपांडे, सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हर्षल मेश्राम, प्रा.विनोद मेश्राम, मैफलाच वतीने प्रल्हाद सोनवाने, लॉयन्स क्लबच्या वतीने अ‍ॅड.विनोद भोले तसेच आचार्य पदवीचे विद्यार्थी डॉ.हेमंत देशमुख, डॉ.दत्तात्रय वाटमोडे, डॉ. वैशाली सुरकर, डॉ. वैशाली पाटील, डॉ. निलीमा कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.