लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी परिस्थिती बदलविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार केल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय जलयुक्त अभियान समितीचे शिल्पा सोनाले यांनी केले.मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी, तुमसर व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ अंतर्गत तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात मंगळवारला कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा अध्यक्ष अॅड.संजीव गजभिये, सचिव अविल बोरकर, जलमित्र हिवराज उके, तालुका कृषी अधिकारी मोहाडीचे के.जी. पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी तुमसरचे एस.जी. उईके, मंडळ कृषी अधिकारी मोहाडी आर.जी. गायकवाड आदी उपस्थित होते. अॅड.संजीव गजभिये यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती प्रत्येकांनी जाणल्यास त्यांना पाण्याचे महत्व कळेल, असे प्रतिपादन केले.यावेळी अविल बोरकर, एस.आर. हुमणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे, पृथ्वीराज शेंडे, गौतम नितनवरे, विठ्ठल निब्रड, अरविंद कांबळे इत्यादींनी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा उद्देश, संकल्पना, व्याप्ती, विविध कामे व निवडीचे निकष, गाव पातळीवर जलयुक्त शिवार अभियान कसे महत्वपूर्ण ठरेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मोहाडी व तुमसर तालुक्यातील ४० गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे एकुण १२० प्रशिक्षणार्थी सहभागी होते.कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण समन्वयक नरेंद्र गणवीर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराचे सागर बागडे, विवेक नंदनवार, ज्वाला कोचे, वैशाली गणवीर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व तुमसर येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
नियोजन केल्यास पाणी समस्या दूर होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:22 IST
अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब विकासात आव्हान ठरत आहे. पाण्याचा पुरेशा उपलब्धतेअभावी कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे.
नियोजन केल्यास पाणी समस्या दूर होईल
ठळक मुद्देशिल्पा सोनाले : तुमसर, मोहाडी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायकांची कार्यशाळा