शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चौकशी केल्यावर फुटले बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:04 IST

आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले.

ठळक मुद्देनौकरीच्या नावावर कोट्यवधीने गंडविल्याचे प्रकरण

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले. मात्र त्यांची नियुक्ती झाली नाही व खोटे कारणे दाखवून त्यांना परत पाठविले. भंडारा येथे आल्यावर काही युवकांनी कामठी येथील मिलिट्री इंटिलेजंस बोर्डकडे जाऊन चौकशी केली असता देण्यात आलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले.सहादेव सोविंदा ढेंगे हा सेवानिवृत्त जवान असून त्याची काही लोकांसोबत ओळख झाली. त्यातुनच बेरोजगार युवकांना लुबाडण्याचे कारस्थान शिजविण्यात आले. आसाम राज्यातील जोरहाट या शहरात राहणाऱ्या एका महिलेने स्वत:ला सेनेच्या कर्नल आहोत असे भासवून संपूर्ण देशभरात आपले एजंट नेमले. आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या ५७४ जागा निघालेल्या असून त्या ठिकाणी मी युवकांना नौकरी लावून देऊ शकतो, अशी बतावनी केल्याने अनेक जण तिच्या बोलण्यात फसले. हरदोली झंझाड येथील सहादेव ढेंगे व भंडारा, धुळे, नागपूर, गोंदिया येथील काही व्यक्ती तिच्यासाठी काम करण्यास तयार झाले. निवृत्त जवान सहादेव ढेंगे याने मोहाडी व तुमसर तालुक्यातील बेरोजगार युवकांना घेवून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचलक्ष २० हजार रूपये घेतले. आतापर्यंत २७ युवक समोर आलेले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या युवकांकडून पैसे घेतल्यानंतर १० आॅक्टोंबर २०१५ रोजी दोन व्यक्तींनी येथील काही युवकांना रेल्वेद्वारे शारीरिक तपासणी करण्यात आली.मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र तेथील बनावट कर्नल असलेल्या महिलेने आपल्या जवळ ठेवून घेतले. त्यानंतर आसाम राज्यातील जोरहाट येथे या युवकांना नेवून रॉयल इन्स्टीट्यूट जोरहाट येथे २८ आॅक्टोबर पासून सर्व युवकांना नर्सिंग असिस्टंटचे तीन महिन्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले. प्रशिक्षणानंतर एक महिन्यात नियुक्ती होईल, असे सांगून सर्व युवकांना परत गावी पाठविले. मात्र वर्ष लोटूनही नौकरी मिळत नसल्याने या युवकांनी सहादेव ढेंगे यांच्याशी संपर्क केला पण तो वेगवेगळे कारण सांगून वेळ मारून नेत होता. या युवकांचा वारंवार तगादा वाढल्याने निवृत्त जवाण सहादेव ढेंगे याने ३ मार्च २०१८ रोजी आसाम रायफल्समध्ये नियुक्ती झाल्याचे पत्र आणून दिले. हे पत्र घेवून जेव्हा सर्व युवक जोरहाट येथे गेले तेव्हा तेथे धुळे येथील एका व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी फिरविले. तांत्रिक अडचणी येत आहेत अजुन १५ दिवस थांबा असे सांगण्यात आल्याने धुळे येथून नौकरीसाठी आलेल्या युवकांनी मिल्ट्री ट्रेनिंग कॅम्पमध्ये जावून चौकशी केली असता हे नियुक्ती पत्र आम्ही दिलेले नाही असे उत्तर मिळाले. कामठी येथील मिल्ट्री इंटिजेलंस विभागात जावून चौकशी केली. तीन चार दिवसांनी त्यांनी चौकशी केल्यावर नियुक्ती पत्र बनावट असल्याचे सांगितल्याने या युवकांनी पोलिसात तक्रार केली.मोठ्या रॅकेटची शक्यताया प्रकरणात अन्य सात आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना अटक करण्यासाठी मोहाडी पोलिसांनी दोन चमू तयार केल्या आहेत. या प्रकरणात फक्त मोहाडी व तुमसरच्याच युवकांना गंडा घालण्यात आला नसून इतर राज्य व जिल्ह्यातील सुद्धा युवकांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आल्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, जळगाव, धुळे, उत्तरप्रदेश येथील युवकांना प्रशिक्षण दिल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मोठा रॅकेट असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.मूळ प्रमाणपत्र भामट्यांच्या ताब्याततक्रारकर्ते २७ युवकांचे मुळ प्रमाणपत्र टीसी, गुणपत्रक, जात प्रमाणपत्र इत्यादी या भामट्यांच्या ताब्यात असल्याने या युवकांना दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज सुद्धा करता येत नाही. ते प्रमाणपत्र मिळवून द्यावे, अशी मागणी या युवकांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी