शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बोदरा तलावाची पाळ फुटल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. एवढेच नाही तर तलावातील जवळपास दहा ते पंधरा लक्ष रुपयाचे मासे वाहून गेले. याला जबाबदार कोण? आधीच लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले.

ठळक मुद्देजलसंधारण विभागातर्फे उपाययोजना शून्य : चौकशी करून दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे साकोली तालुक्यातील बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. यामुळे तलावातील ९० टक्के पाणी आधीच वाहून गेले असून या तलावात दररोज पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. मात्र संबंधित विभागाने अजूनपर्यंत काहीच उपाययोजना न केल्यामुळे येणारे पाणीही तलावाबाहेर जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व मासेमार सहकारी संस्थांनी केली आहे.या तलावाचे खोलीकरण करून तलावाच्या पाळीचे व तुडुमाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन व माहिती गावकरी, मच्छीमार सोसायटी व जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी दिली होती. यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. एवढेच नाही तर तलावातील जवळपास दहा ते पंधरा लक्ष रुपयाचे मासे वाहून गेले. याला जबाबदार कोण? आधीच लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले. त्यामुळे मासेमारी करणारे व शेतीवर आधारीत शेतकऱ्याचे मोठे हाल झाले आहे. सदर तलाव ३३ हेक्टर जमिनीत असून या तलावाच्या पाण्यापासून ५६ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत होती. मात्र आता तलावात पाणीच शिल्लक नसल्याने यावर्षी शेतीला सिंचनाची समस्या उद्भवणार आहे.साकोली तालुक्यातील बहुतेक तलाव माजी मालगुजारी तलाव आहेत. ही सर्व तलाव फार जुनी आहेत. बऱ्याच तलावातील गाळ काढणे, वेस्टवेअरची कामे, पाळ दुरुस्त करणे अशी कामे जलसंधारण विभागामार्फत करण्यात आली नाही. तलावांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक तलावांच्या पाळीची स्थिती भयावह आहे. तलावाच्या पुर्नविकासासाठी आतातरी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.उन्हाळी शेतीचा प्रश्न भेडसावणारबोदरा येथील फुटलेल्या तलावाच्या पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जात होती. मात्र यावर्षी तलावात पाणी शिल्लक नसल्याने पावसाळी व उन्हाळी धानाचे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार जलसंधारण विभागच आहे. अशा प्रतिक्रिया शेतकरी व परिसरातील नागरिकांच्या आहेत.बोदरा तलावाच्या पाळीची दुरुस्ती करण्यात यावी अशी माहिती लेखी स्वरुपात संबंधित विभागाला दोन वर्षापूर्वी दिली होती. तरीही पाळ दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाळ फुटली. त्यामुळे मच्छीपालन संस्थेचे २० लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. या तलावावर मच्छीपालन सहकारी संस्थेच्या शेकडो सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.-हेमकृष्ण दिघोरे, अध्यक्ष, नवनाथ मच्छीपालन संस्था, बोदरा.तलावाची पाळ दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सतत दोन वर्षापासून जलसंधारण विभागाला पाठपुरावा करीत होतो. मात्र अधिकाºयांचा कामचुकारपणा व निष्काळजीपणा या तलावाच्या पाळ फुटीला कारणीभूत ठरला. झालेले शेतीचे व मच्छीमार सोसायटीचे नुकसान जलसंधारण विभागाने भरून द्यावे, तसेच दोषी अधिकाºयावर योग्य ती तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा पुढचे नियोजन केले जाईल.- होमराज कापगते, जिल्हा परिषद सदस्य.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर