शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही १४३ जणांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

 भंडारा जिल्ह्यात २७  एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजतागायत जिल्ह्यात ८१७ कोरोना मृतांवर गत वर्षभरापासून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेकदा बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावरच येत आहेत. काही नातेवाईक कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारालाही येत नसल्याचेही वास्तव आहे. हे सांगतानाही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

ठळक मुद्देनातेवाईक पाहतात दुरूनच : अंत्यविधीसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पुढाकार

संतोष जाधवर लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवून दिला आहे. त्यामुळे जवळचे सख्खे रक्ताचे नातेवाईक असो की स्वतःचा मुलगा, मुलगी, बायको, भाऊ, बहीणही कोरोना संसर्गामुळे मृतांना नाकारू लागल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.  भंडारा जिल्ह्यात २७  एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजतागायत जिल्ह्यात ८१७ कोरोना मृतांवर गत वर्षभरापासून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेकदा बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावरच येत आहेत. काही नातेवाईक कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारालाही येत नसल्याचेही वास्तव आहे. हे सांगतानाही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. अंत्यसंस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत नगरपरिषदेचे कर्मचारी नातेवाईकांची वाट पाहतात, मात्र नाईलाजाने कोणी न आल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वत:च पार  पाडतात. यामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, अभियंता प्रशांत गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यसंस्कार केले जात आहेत. यात नियुक्त कर्मचारी सफाई मुकादम रक्षित दहिवले, सफाई कामगार सीताराम बांते,  नेहल बांबोळे, सीताराम बांते, निखिल  डूभरे, बळवंत दुंभरे, जसपाल सोनेकर, राकेश वासनिक, मुकेश झाडे, सुभाष टेंभेकर, कमलेश शहारे, आनंद उके, भवसागर दिनेश, दिलीप नारनवरे, सुनील दास, मुकेश शेंद्रे, राहुल देशमुख, संग्राम कटकवार, धम्मदीप बडोले, अमर बावणे, श्याम बावणे, दादू सकदेवे, विशाल सहारे, आदेश मेश्राम, रोहित सोनकर, संजय चिनकुरे  यांच्यासह अन्य रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी कोरोना मृताच्या कुटुंबीयांना धीर देत अत्यंत जोखमीचे असणारे अंत्यविधीचे काम पार पाडत आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९,६७३ झाली आहे. आतापर्यंत ३ लाख २९ हजार ५४८ व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ३७,७९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी  ३४  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या एकूण ७१७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.०८ टक्के आहे. कोरोना मृतांचा आकडा वाढला असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार. मात्र त्या कर्मचाऱ्यांशीही स्मशानभूमीत काही नातेवाईक हुज्जतबाजी घालत असल्याचेही कटू प्रसंग त्यांनी अनुभवले. येणाऱ्या नातेवाईकांना पीपीई किट घालण्यापासून ते योग्य अंतर राखण्यापर्यंत हेच कर्मचारी मार्गदर्शन करतात. कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या असा सल्लाही देत आहेत. भावुक न होता या कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. 

पाच जणांची परवानगी असली तरी गर्दी टाळण्यासाठी दोघांनाच परवानगीकोरोना रुग्णाचे निधन झाल्यानंतर त्या मृतांवर भंडारा शहराजवळील गिरोला येथील कोरोना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी मृताच्या नातेवाईकांना पीपीई किट घालून उपस्थित राहणे अनिवार्यआहे. अंत्यसंस्काराला पाच जणांना शासनाची परवानगी असली तरी अलीकडे भंडारा जिल्ह्यात वाढलेला कोरोना मृतांचा आकडा लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी दोघांनाच परवानगी दिली जाते. कोरोना मृतांचा आकडा वाढल्यापासून अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी पहाटे सहा वाजताच घराबाहेर पडतात. स्वतःचा, कुटुंबीयांचा विचार न करता हे सामाजिक भावनेतून हे कर्तव्य गेल्या वर्षभरापासून ते पार पाडत आहेत. नातेवाईकांची अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवत असल्याचे सांगताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. 

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना चांगले, वाईट दोन्ही अनुभव आले. अखेरच्या क्षणी जवळचे नातेवाईक, स्वतःचा मुलगाही कसा हात झटकतो, हे जवळून पाहता आले. हे चित्र अनुभवताना अनेकदा मला अश्रू अनावर झाले. सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. - सीताराम बांते, अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी

कोरोना बाधित मृतांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शासननियमानुसार माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार पार पाडले जात आहेत. कोरोना मृतांजवळ नातेवाईक यायलाही घाबरतात. मात्र कुणीही घाबरू नये, स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी.- प्रशांत गणविर, कनिष्ठ अभियंता न.प. भंडारा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू