शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By admin | Updated: February 5, 2016 00:35 IST

शहराच्या राजेंद्र नगरातील संताजी सभागृहाजवळ मंजूर उद्यान व सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम रखडल्याप्रकरणी ...

नगर पालिकेचे आश्वासन : तीन महिन्यात मागण्या पूर्ण होणारतुमसर : शहराच्या राजेंद्र नगरातील संताजी सभागृहाजवळ मंजूर उद्यान व सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम रखडल्याप्रकरणी शहरातील विविध संघटनांचे १३ जणांनी आमरण उपोषण मंगळवारी सुरु होते. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शहरातील बाजार परिसरातील हुतात्मा स्मारकाजवळ त्यांनी उपोषण प्रारंभ केला होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देवून मागण्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली. संताजी सभागृहाजवळील मोकळ्या जागेवर मंजूर उद्यान व सभागृहाचे बांधकाम सन २०१२ पासून रखडले आहे. याबाबत संबंधितांना पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात आले. उद्यान व सभागृहाचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे, याकरिता शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शांततामय मार्गाने आमरण उपोषणाचा निर्णय शहरातील विविध संघटनांच्या १३ प्रतिनिधींनी घेतला. उद्यान व सभागृह बांधकामाकरिता सुनिल श्रावणकर यांनी २८ फेब्रुवारी २०१२ ते ४ आॅगस्ट २०१५ असे तीन वर्ष सतत संबंधितांना पत्रव्यवहार केला. परंतु कारवाई झाली नाही. सदर प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांनाही पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्या पत्राचे आजपर्यंत उत्तर देण्यात आले नाही. याकरिता सुनिल श्रावणकर, वामन पडोळे, विजय पाटील, महेंद्र उईके, शैलेश मेश्राम, संजय धुर्वे, कैलाश साठवणे, विनोद देशमुख, श्रावण रोहणकर, सिद्धार्थ थार्सेकर, सुनिल वंजारी, लोणारे, चंदेल यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)