शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पेंढरी पुनर्वासीयांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:54 IST

पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रशासनाने घेतली दखल : पाण्याचा स्रोत शोधण्याची गरज

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले.पेंढरी पुर्नवसन येथे गेला एक महिन्यापासुन पिण्याचा पाण्याचा मोठा गहन प्रश्न उपस्थित झाला होता. पिण्याचे पाणी जिथे मिळत नसणार तेथील ग्रामस्थांची मनस्थिती काय असणार? येथील ग्रामस्थ पिण्याचे पाण्यासाठी पहाटेपासूनच पाण्याचा संकलनासाठी धावपळ करायचे, या पुर्नवसन ठिकाणच्या एक ना अनेक समस्या आहेत. या सोडविण्यासाठी अनेक मोठमोठ्या नेत्यांनी तथा लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले. परंतु सर्व पालथ्या घागरीवर पाणीच! ग्रामस्थांच्या मते टँकरद्वारे आलेले पाणी हे फक्त १५ जून पावेतो पुरवठा होणार असल्याचे गावात आलेल्या काही अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले असल्याचे सांगितले.१५ जून नंतर पुन्हा ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा शोधात जावे लागणार काय? गावात विहिर तडाला गेली, हात पंपाचे पाणी पिण्यायोग्य सहा पैकी एकाच हातपंपाचे. शासन तथा प्रशासनाने या १५ दिवसाच्या कालावधीत पेंढरी पुर्नवसन ग्रामवासींयाना मोफत पिण्याचे पाणी मिळणार अशी व्यवस्था करावी. कारण प्रत्येक कुटुंब पाणी विकत घेऊन पिण्याची क्षमता नाही. ज्या कुटुंबाची वा व्यक्तीची क्षमताच नाही त्यांच्या घरात पिण्याचे पाणी जाणार तरी कसे? असाही प्रश्न उपस्थित होतो.१५ दिवस पिण्याचे पाणी मिळणार असले तरी यासाठी ग्रामवासींयानी शासन तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. यापुढे ग्रामवासींयाना नियमित पिण्याचा पाण्याचा पुरवठा होणार का नाही? यासाठी १५ दिवसात दुसरा पाण्याचा स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य आहे अशा ठिकाणी अधामधात बोअरवेल मशीन लावल्यामुळे गढुळ पाणी येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई