शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बावनथडीचे पाणी पोहचले शेतशिवारापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:53 IST

केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.

ठळक मुद्दे४३ वर्षांची प्रतीक्षा फळाला : १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन सुरु

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्पाचे काम बंद पडले होते. परंतु या प्रकल्पाने या सर्वांवर मात करीत सिंचन क्षमता गाठली आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील बावनथडी नदीवर १९७५ मध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान वेगवर्धीत कृषीसिंचन योजनेत बावनथडी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. मात्र २०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धरण अपूर्ण राहिले. धरणाच्या लाभक्षेत्रात ७७ गावांचा समावेश आहे. धरणाचे १९९५ मध्ये नियोजन झाले. तेव्हा ११.६६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. येथे पुनर्वसन, वनविभागाची मान्यता तथा भूसंपादन प्रक्रिया रेंगाळल्याने आता प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ २०१८ मध्ये मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम तथा इतर अधिकाऱ्यांच्या चमूने आव्हान स्वीकारले. केवळ तीन वर्षात १५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. धान उत्पादन करणाºया भंडारा जिल्ह्यातील विशेषत: तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. २००४ मध्ये प्रकल्पाचा समावेश केंद्रीय सिंचन यंत्रणेत करण्यात आला. परंतु दहा वर्षात केंद्र सरकारकडून १४९ कोटी रुपये प्रकल्पासाठी प्राप्त झाले. केंद्राचे २५ टक्के तर राज्याचे उर्वरीत १८५.७२ कोटी रुपये प्रकल्पाला प्राप्त झाले होते. शेती सरळ खरेदीने ३५१ हेक्टर पैकी ४२ हेक्टर शिल्लक असून १८ हेक्टर शेतीचा मोबदला देणे बाकी आहे. सुमारे १३ हजार हेक्टर पादचारी कामे करण्यात आली. आता या प्रकल्पाचा लाभ माडगी, चारगाव, ढोरवाडा, बोरी येथील शेतकºयांना होत आहे.धरणातून प्रत्यक्ष सिंचनाच्या लाभासाठी ४३ वर्ष लागले. तुमसर तालुक्यातील शेतकºयांचे प्रकल्पासाठी मोठे योगदान आहे. तीन वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने प्रकल्प पूर्णत्वास जााण्यास मदत झाली. पाटबंधारे विभागातील अधिकारी व सहकाºयांमुळे १५ हजार ३०० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे.-अरविंद गेडाम, कार्यकारी अभियंता, बावनथडी प्रकल्प.