देवानंद नंदेश्वर ।आॅनलाईन लोकमतभंडारा : येथील एसटी बसस्थानकात असलेल्या ‘हिरकणी कक्षा’चा उपयोग गोदामासारखा केला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीला आणले. या वृत्ताची दखल घेत एस.टी. प्रशासनाने शुक्रवारी तातडीने या कक्षातील साहित्य हटवून स्तनदा मातांसाठी कक्ष खुले केले. मात्र जनजागृतीअभावी स्तनदा माता हिरकणी कक्षाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून आले.भंडारा बसस्थानकाची गुरूवारला पाहणी केली असता हिरकणी कक्षात साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. यावेळी कक्षाचा दुरूपयोग ैहोत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ‘लोकमत’ मध्ये शुक्रवारला ‘हिरकणी कक्ष नव्हे हे तर गोदामच!’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर भंडारा आगारातील अधिकाºयांनी कक्षातील साहित्याची इतरत्र विल्हेवाट लावली. कक्षाची स्वच्छता करण्यात आली. या कक्षात एक टेबल लावण्यात आले. हिरकणी कक्ष स्तनदा मातांसाठी खुले केले असले तरी आज एकही स्तनदा माताने या कक्षाचा लाभ घेतला नसल्याचे सांगण्यात आले.
अखेर ‘हिरकणी कक्षा’तील साहित्य हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:00 IST
येथील एसटी बसस्थानकात असलेल्या ‘हिरकणी कक्षा’चा उपयोग गोदामासारखा केला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीला आणले.
अखेर ‘हिरकणी कक्षा’तील साहित्य हटविले
ठळक मुद्देभंडारा एस.टी. प्रशासनाने घेतली दखल : स्तनदा मातांनी दाखविली हिरकणी कक्षाकडे पाठ