शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसानंतर काही आरोपी फरारच

By admin | Updated: September 3, 2015 00:25 IST

राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सहभागी आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे एक पथक बुधवारी रवाना झाल्याचे समजते.

तुमसर पोलिसांचे पथक रवाना : नगरसेवक प्रशांत उके हत्या प्रकरणतुमसर : राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सहभागी आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे एक पथक बुधवारी रवाना झाल्याचे समजते. १२ आॅगस्ट रोजी हल्ला झाला होता. या प्रकरणातील पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले. जखमी स्थितीत नगरसेवकाने पोलिसांना ८ ते १० आरोपींची नावे सांगितली होती. उर्वरित आरोपींना अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर १२ आॅगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणातील ५ आरोपींना पोलिसांनी नागपुरातून अटक केली. २४ तासात दोन व उर्वरीत तीन आरोपींना दोन दिवसात ताब्यात घेण्यात आले. दि. २१ आॅगस्ट पर्यंत या आरोपींची तुमसर पोलिसांनी पोलीस कोठडी घेतली होती. २२ आॅगस्टला त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा ३१ आॅगस्टला मृत्यू झाला. दि. १ सप्टेंबरला राकाँसह सर्वपक्षीय नगरसेवक न.प. अध्यक्षांनी तुमसर पोलिसांना सहभागी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जखमी स्थितीत खुद्द प्रशांत उके यांनी आरोपींची नावे सांगितली होती हे विशेष. पोलीस प्रशासनाने उर्वरीत सहभागी आरोपींचा का शोध घेतला नाही हा मुख्य प्रश्न आहे. संशयीत म्हणून तरी त्यांना ताब्यात घेण्याची गरज होती असे बोलल्या जात आहे. जखमी अथवा मृत्यपूर्व बयाण हा मोठा आधार अशा खटल्यात मानला जातो. राकाँच्या शिष्टमंडळाने निवेदन देताच तुमसर पोलिसांचे एक पथक रवाना झाले हे न उलगडणारे कोडेच आहे.हल्ल्याच्या २२ दिवसानंतर पुन्हा सहभागी आरोपींचा शोध घेण्याकरिा पोलीस कामाला लागली. अशा हल्ल्यात निश्चितच मास्टरमार्ईंड असतो. संपूर्ण आरोपींची एकाचवेळी चौकशी व ओळख परेडमुळे बिंग फुटण्याची शक्यता अधिक असते. २२ दिवसानंतर आरोपी मोकाट असल्याने उके कुटुंबियांना धोक्याची शक्यता आहे. या बाबीकडे पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नगरसेवक प्रशांत उके यांचे अस्थिकलश बुधवारी कोष्टी (वैनगंगा) घाटावर विसर्जीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)