शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

भेसळयुक्त खाद्य तेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता तेलपिप्याचे खरेदीचे बिल आढळून आले नाही.

ठळक मुद्देठाणा येथे कारवाई : अन्न व औषधी प्रशासनाची धाड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची विक्री वाढत असते. याचाच फायदा घेवून कमी दर्जाचे व भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री होत असते. अशाच गोपनीय माहितीच्या आधारे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ठाणा पेट्रोलपंप येथे एका पेढीवर कारवाई करीत ११ टीन खाद्य तेलाचे पीपे जप्त केले.भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता तेलपिप्याचे खरेदीचे बिल आढळून आले नाही. सदर खाद्य तेलाची पॅकिंग गडेगाव येथील असून ते तेल कमी दर्जाचे असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. सदर पीपे जप्त करून तेल तपासणीसाठी नमूने घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या तेलाच्या साठ्याची किंमत १४ हजार १६१ रूपये सांगण्यात येते.सदर कारवाई अन्न व औषध सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक उपायुक्त जयंत वाणे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर नंदनवार यांनी केले. जिल्ह्यात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांमध्ये भेसळ करुन विकली जातात. याबाबत ग्राहकांनीही जागरुक राहून खरेदी केली पाहिजे असे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी