तुमसर : जंगलव्याप्त तुमसर तालुक्यातील बराचसा भाग आदिवासीबहुल भागात आहे. या तालुक्यात वनसंपदा अधिक असून वन्यप्राण्यांचे अधिवासही आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारी करण्यासाठी टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वन्यपशू व वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यापासून वन्यप्राण्यांची शिकारी सुरु असूनही वनअधिकारी व त्यांचे खबरे अनभिज्ञ आहेत. तुमसर तालुक्यांतर्गत तीन वनपरिक्षेत्र येतात. त्यात लेंडेझरी, नाकाडोंगरी व तुमसर वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. तुमसर वनपरिक्षेत्राचा विस्तार कमी असून घनदाट जंगल कोका अभयारण्यात समाविष्ट झाला आहे. लेंडेझरी व नाकाडोंगरी वनक्षेत्र सातपुडा पर्वतरांगात असून घनदाट जंगलात आहे. शिकारीचे मांस विकत घेणारे ग्राहक निश्चित असल्यामुळे परस्पर विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे शिकारीच्या घटनेची कुठेही वाच्यता होत नाही. (तालुका प्रतिनिधी)
तुमसर तालुक्यात शिकारी टोळी सक्रिय
By admin | Updated: November 22, 2014 22:56 IST