शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्याची कारवाईतून वाचण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:28 IST

जिल्हा परिषदेतील एका विभागात कार्यरत कर्मचाऱ्याची नित्याने नवनवीन प्रकरण समोर येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदमधील प्रकरण : दोन प्रकरणातील निलंबनानंतरही पदोन्नती

प्रशांत देसाई।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषदेतील एका विभागात कार्यरत कर्मचाऱ्याची नित्याने नवनवीन प्रकरण समोर येत आहे. या कर्मचाºयावर दोन प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान ‘लोकमत’ने कामाच्या सेटिंगबाबत दोन दिवसांपासून मालिका लावली आहे. वृत्त प्रकाशित होत असल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्याने धडपड चालविली आहे. दरम्यान ‘तो’ कर्मचारी कोण ही उत्सुकता येथील सर्व कर्मचाऱ्यांना लागली आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत पडलेल्या कर्मचाऱ्याच्या फाईल्स सीईओंनी ‘झिरो पेंडेंसी’ उपक्रमांतर्गत पूर्णत्वाचा धडाका लावला आहे. अधिकाºयांच्या पुढाकारातून अनेक कर्मचाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासूनचा थकीत आर्थिक मोबदला मिळाला आहे. असा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदमध्ये राबविला जात असतानाच येथीलच एका विभागातील कर्मचाºयाने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी सांभाळून अंतिम टप्प्यात असलेल्या फाईल्स स्वत:च्या ताब्यात घेतल्या. या माध्यमातून सर्व फाईल्सधारक कर्मचाऱ्याना फोनद्वारे त्यांचे काम ‘फत्ते’ करण्याकरिता पैशाची मागणी करण्याचा प्रकार सुरु केला. ही बाब महिला कर्मचाऱ्यासंदर्भात घडत असल्याने या कनिष्ठ कर्मचाऱ्याप्रती सर्वत्र रोष व्यक्त होत आहे.कामांच्या सेटिंगच्या मोबदल्यात आर्थिक तडजोड करावी, अशी मागणी होत असल्याने ‘लोकमत’ने दोन दिवसापासून हा प्रकार लावून धरल्याने संबंधित कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले असून अनेकांना अद्यापही ‘तो’ कर्मचारी कोण? ही भूमिका उत्सुकतेकडे नेणारी आहे. दरम्यान ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेमुळे जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने ‘तो’ कर्मचारी कोण? याची चाचपणी सुरु केली आहे.दरम्यान या प्रकरणातून स्वत:ला वाचविण्यासाठी ‘या’ कर्मचाऱ्याने धडपड सुरु केली आहे. समाज संघटनेच्या माध्यमातून एका कथीत पदाधिकाऱ्याने रविवारला सकाळी प्रस्तुत प्रतिनिधीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रकरण थांबविण्याची गळ घातली.‘या’ कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळूनच हा प्रकार सुरु केल्याचे आता याच विभागातील कर्मचारी चर्चा करीत आहेत. मागील काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी यांनी या कर्मचाऱ्याकडे विविध प्रकारच्या कामांचा भार दिला. मात्र त्याच्या ‘सेटिंग’ स्वभावामुळे कार्यालयातीलच अन्य सहकाऱ्यांनी त्यांच्या विभागप्रमुखाला त्याच्याकडून प्रभार काढण्याची मागणी केली होती. मात्र त्याला न जुमानता त्याच्याकडेच कामाचा भार देण्यात विभाग प्रमुखाने स्वारस्य दाखविले आहे, हे विशेष.गैरव्यवहार प्रकरणी दोषी आढळल्याने दोनदा निलंबनजिल्हा परिषद भंडारा येथे रूजू होण्यापूर्वी हा कर्मचारी मोहाडी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना तेथील गैरव्यवहाराचा ठपका त्याच्यावर करण्यात आला होता. यात तो दोषी आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्याची जिल्हा परिषदेच्या एका हायस्कुलमध्ये बदली करण्यात आली. तिथे विद्यार्थिनींच्या एका प्रकरणात दोषी आढळून आल्याने त्याच्यावर दुसºयांदा निलंबनाची कारवाई केली. दुसºया निलंबनाच्या कारवाईनंतर या कर्मचाºयाची साकोली पंचायत समितीमध्ये बदली करण्यात आली होती. त्यानंतर आरक्षणाच्या बळावर या कर्मचाºयाला जिल्हा परिषद येथे पदोन्नतीवर पाठविण्यात आले. असा या कर्मचाऱ्याचा पूर्व इतिहास असल्याने या कर्मचाºयावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.