शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी

By admin | Updated: May 31, 2017 00:37 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती.

प्रकरण अविश्वास प्रस्तावाचे : गायधने यांच्या विरूद्ध १०-० ने ठराव पारितलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती. याकरिता आलेल्या संचालकांविरुद्ध रोष व्यक्त करून शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी हाणामारी केली. हा प्रकार उपजिल्हा निबंधक कार्यालयात मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे तणावाच्या वातावरणात विद्यमान अध्यक्षांविरुद्ध १० विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला.भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने यांच्याविरूद्ध हा अविश्वास ठराव पारित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेल्या गायधने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संघातील पाच संचालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेशी हातमिळवणी केली. अखिलचे पाच व विद्यमान कार्यकारिणीतील पाच अशा दहा संचालकांनी अध्यक्षांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर हे दहाही संचालक पर्यटनवारीवर गेले होते. या दहा संचालकांमध्ये रमेश सिंगनजुडे, शंकर नखाते, रमेश काटेखाये, विजया कोरे, शिवकुमार वैद्य, अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, प्रकाश चाचेरे, संजीव बावनकर, यामिनी गिऱ्हेपुंजे यांचा समावेश आहे.या अविश्वास प्रस्तावावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दुपारी १ वाजता चर्चा आयोजित केली होती. याकरिता पर्यटनवारीवरील हे दहाही संचालक पाच मिनिटांपूर्वी वाहनाने कार्यालय परिसरात दाखल झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेकडो शिक्षकांनी फुटीरवादी संचालकांविरुद्ध घोषणाबाजी केली. यातील काहींनी या संचालकांना पकडून धक्काबुक्की व मारहाण करीत कपडे फाडले. दोन शिक्षक संघटनांच्या राजकीय वर्चस्वाच्या अधिपत्यामुळे हा प्रकार घडला. आक्रमक शिक्षकांच्या तावडीतून संचालकांना कसेबसे बाहेर काढून जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. यानंतर सहाय्यक उपनिबंधक एस.जे. हटवार व सहकार अधिकारी श्रेणी २ चे निलेश जिभकाटे यांच्यापुढे या दहाही संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. चर्चेदरम्यान पतसंस्थेचे संचालक रमेश सिंगनजुडे यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आणि त्याला उपस्थित नऊ संचालकांनी अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अन्य एक संचालक गैरहजर होते. ५९ वर्षातील पहिली घटनाजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. त्यानंतर अध्यक्ष व संचालक मंडळांनी येथे कारभार केला. मात्र अविश्वास प्रस्ताव आल्याने त्याला सामोरे जाताना संचालकांशी घडलेला हा प्रकार पतसंस्थेच्या ५९ वर्षाच्या इतिहासातील पहिलाच आहे.पोलीस आले अन् निघून गेलेशिक्षकांच्या दोन गटात आज धक्काबुक्की व हाणामारी झाल्याची माहिती निबंधक कार्यालयाने पोलिसांना दिली. मात्र पोलीस तब्बल दीड तासानंतर घटनास्थळी दाखल झाले.हवालदारासह आलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठल्यानंतर अधिकाऱ्यांच्या तोऱ्यात केवळ पाहणी केली व प्रकरण गंभीर वळण घेईल, कदाचित या भीतीने त्यांनी तिथून काढता पाय घेतला. असा प्रकार होईल याची पूर्वसूचना शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी निबंधक कार्यालयाला दिली होती. त्यामुळे अगोदरच पोलीस बंदोबस्त मागण्याची सूचनाही त्यांना केल्यानंतरही कार्यालयाने त्याची दखल घेतली नसल्याचा संताप संचालकांनी व्यक्त केला.संस्थेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन शिक्षक बांधवांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात आले. माझ्या कार्यकाळात संस्थेच्या हिताचे काम करून नावलौकिक केले. - विकास गायधने,अध्यक्ष, शिक्षक सहकारी पतसंस्थासंचालकांना विश्वासात न घेता विद्यमान अध्यक्षांनी मनमर्जीने कामकाज केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात आला.-रमेश सिंगनजुडे, संचालक तथा जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ