शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई

By admin | Updated: March 17, 2017 00:27 IST

राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध

समिती स्थापन : अधिकाऱ्यांचे पथक करणार रूग्णालयांची तपासणी भंडारा : राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकामार्फत रूग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधून पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत दवाखाने, डॉक्टर्स, गर्भपात केंद्राची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येते. मात्र अनधिकृत डॉक्टर आणि नोंदणीकृत नसलेल्या रूग्णालयांमध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रुण हत्या झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी राहणार असून त्यांचे पथक तयार करण्यात येईल. या पथकाकडून जिल्ह्यातील रूग्णालय तपासणीची संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरावरही समिती गठीत करण्यात येणार असून आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाने केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करेल. या मोहिमेत पी.सी.पी.एन. डी.टी. कायदा, एम.पी.टी. कायदा आदींची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही. रेकॉर्ड व्यवस्थित ठेवला जातो की नाही याबाबत तपासणी केली जाणार आहे. यासाठी तालुका स्तरावर समिती गठित करण्यात येणार असून तपासणीदरम्यान काही आक्षेपार्ह आढळल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या डॉक्टर्स किंवा रूग्णालयास त्रास होणार नाही , याची खबरदारी घेण्यात येईल, असेही सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांच्यासह शासकीय व खासगी रूग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)