भंडारा : दूध हे सर्वोत्तम अन्न मानले जाते. लहान मुलांचे पौष्टिक खाद्य म्हणून दुधाचा पहिला क्रमांक लागतो; मात्र जनावरांना दूधवाढीसाठी हार्मोनल इंजेक्शन देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दूध आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
इंजेक्शनचा वापर टाळा!राज्यातील काही भागांमध्ये दूधवाढीसाठी इंजेक्शन वापरण्याचे प्रकार समोर आले आहेत. तथापि, भंडारा जिल्ह्यामध्ये अद्याप असे प्रकरण निदर्शनास आलेले नाही.
अन्न व औषध प्रशासनाकडून खुले दूध व पॅकेटबंद दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. यामधून दूधवाढीसाठी इंजेक्शनचा वापर झाला आहे का, किंवा इतर अनुचित प्रकार घडले आहेत का, याची पडताळणी केली जाते.
पॅकेटबंद दुधाला वाढती मागणीग्रामीण भागातून पूर्वी मिळणारे खुले दूध अधिक पौष्टिक मानले जात असे. मात्र, गेल्या काही वर्षांत पॅकेटबंद दुधाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
कुठे तक्रार करावी?जनावरांना दूधवाढीसाठी इंजेक्शन दिल्याचा संशय असेल किंवा दुधात भेसळ आढळल्यास, अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडे तक्रार करावी.
जनावरांच्या दुधात भेसळ वा अनुचित बाब आढळल्यास, ग्राहकांनी त्वरित तक्रार नोंदवावी. अन्न व औषध विभागाकडून दुधांच्या नमुन्यांची तातडीने तपासणी केली जाईल. - यदुराज दहातोंडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.