लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. तर पत्नी गंभीर जखमी झाली. भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.दिलीराम कवडू वाघाये (५०) रा. केसलवाडा (वाघ) असे मृताचे नाव आहे. त्यांची मुलगी स्नेहा वाघाये हिचा विवाह २१ एप्रिल रोजी आयोजित आहे. त्यासाठी नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी ते पत्नी संगीता (४५) यांच्यासोबत शनिवारी सकाळी केसलवाडावरून निघाले. लाखनी येथे पेट्रोल भरून केसलवाडा (राघोर्ते), किटाळी, पालांदूर, पेंढरी या गावांना मुलीच्या लग्नपत्रिका वितरित करण्यासाठी जाण्याचे नियोजन होते. राष्ट्रीय महामार्गावर केसलवाडा फाट्यावर लाखनीकडे वळण घेत असताना भंडाराकडून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक आरजे ०४ जीए ८३२२ ने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दिलीराम जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेली पत्नी संगीता गंभीर जखमी झाली. या अपघाताचे वृत्त माहित होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संगीताला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मुलीच्या लग्नाचा आनंद सोहळ्याची तयारी करताना वडिलांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटताना वडिलांचा अपघाती मृत्यू, आई जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) ...
मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटताना वडिलांचा अपघाती मृत्यू, आई जखमी
ठळक मुद्देकेसलवाडा फाट्यावरील घटना