लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भरधाव ट्रकने एका कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना तुमसर - गोंदिया मार्गावरील नवेगाव शिवारात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडली. अपघातग्रस्त रामटेक येथील अंबाला परिसरातील आहे.संजय गौतम (५३) रा.अंबाला रामटेक असे मृताचे नाव आहे. तर पत्नी रंजना गौतम (४५), मुलगा लक्ष्मण गौतम (२२) अशी जखमीची नावे आहेत. गौतम कुटुंबिय मंगळवारी सकाळी अंबाला येथून मिरनापूर (बालाघाट) येथे कारने (एमएच३१ एजी १६७७) ने जात होते. तुमसर गोंदिया राज्य मार्गावरील नवेगाव शिवारात ट्रकने (एमएच ४० वाय ३५२७) समोरून धडक दिली. त्यात कारचा चुराडा झाला. संजय गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर या मार्गावरून इतर प्रवाशांनी जखमींना बाहेर काढून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आठ वर्षापूर्वी याच स्थळावर झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण ताजी झाली.
अपघातात पती ठार, पत्नी व मुलगा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:48 IST
भरधाव ट्रकने एका कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना तुमसर - गोंदिया मार्गावरील नवेगाव शिवारात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडली. अपघातग्रस्त रामटेक येथील अंबाला परिसरातील आहे.
अपघातात पती ठार, पत्नी व मुलगा गंभीर
ठळक मुद्देट्रकची कारला धडक : तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरील नवेगाव शिवारातील घटना