शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांचे प्रवेश ‘वेटिंग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:29 IST

मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली असे म्हणण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : मोफत शिक्षण नव्हे, बोगस शिक्षण प्रणाली

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली असे म्हणण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.शिक्षण हक्क कायद्याने ६ ते १४ वर्ष वायोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी विशिष्ट घटकांना शिक्षण असे नसून सरसकट राज्यातील सर्व मुलांना शिक्षण असे आहे. शासनाने सुुरु केलेल्या व शासनाच्या अनुदानावर असलेल्या शाळा शिक्षण देण्याचे काम करतात. परंतु पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासन कोणतेही अनुदान देत नाही. त्यामुळे मुलांच्या पालकांकडून शुल्क वसुल केले जाते. सर्वसामान्यांच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकता यावे यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज दाखल करणाºयांची संख्या वाढली. अर्ज दाखल करणारे पात्र आहेत म्हणून अर्ज भरतात. मात्र केवळ २५ टक्के मुलांना प्रवेश देण्यात येतो. शिक्षणासाठी मोफत आणि सक्तीचा कायदा असताना २५ टक्के मुलांनाच का प्रवेश असा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत ही प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.अंतराच्या निकषाचा घोळनामवंत शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी दिवसेंदिवस नवीन शक्कल लढविली जाते. जिल्ह्यातील अनेक शाळा लोकवस्तींपासून लांब अंतरावर आहे. अनेक शाळेत मुलांना एक किमीच्या आत अंतराचा निकष प्रवेशासाठी आहे. त्याचबरोबर शाळेपासून लांब वास्तव्य असलेल्या अनेक मुलांना एक किमी अंतराच्या निकषावर प्रवेश मिळाला. याला आरटीई अंतर्गत राबविण्यात येणारी सदोष प्रवेश प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.अधिकारशाही वाढलीआरटीई अंतर्गत प्रवेश घेणाºया बालकांच्या शुल्क प्रतिपूर्तीच्या स्वरुपात शाळांना देण्यात येते. शाळांना मिळणारा हा पैसा शिक्षण विभागाच्या डोळ्यात भरत आहे. शिक्षण देण्याच्या मोबदल्यात मिळणारा पैसा मिळविण्यासाठी शाळांना त्रास सहन करावा लागतो. प्रतिपूर्ती म्हणून देण्यात येणाºया रकमेवर आता अधिकारशाहीचा डोळा आहे. ऐनकेन कारणाने त्यांना वेठीस धरले जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण