शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

प्रत्यक्ष प्रचाराला आजपासून वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात स्थगिती दिल्याने त्या गट व गणातील निवडणूक प्रक्रियेला थांबा देण्यात आला. आज बुधवारी न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवत ठरल्याप्रमाणे अन्य जागांवर २१ डिसेंबरला निवडणुका घेण्याचा निकाल दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  ओबीसी प्रवर्गातील गट आणि गणातील निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती कायम ठेवून इतर गट व गणातल्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश बुधवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार गुरुवारपासून सुरु होणार आहे. मात्र, या सर्व पेचप्रसंगात निवडणुकीतील उत्साह मात्र ओसरल्याचेच चित्र आहे, तर दुसरीकडे प्रचाराला फक्त चार दिवसांचा कालावधी मिळणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात स्थगिती दिल्याने त्या गट व गणातील निवडणूक प्रक्रियेला थांबा देण्यात आला. आज बुधवारी न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवत ठरल्याप्रमाणे अन्य जागांवर २१ डिसेंबरला निवडणुका घेण्याचा निकाल दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समित्यांच्या २५ गणांमधील निवडणुका ओबीसी आरक्षण स्थगितीमुळे होणार नाहीत. मात्र, आता जिल्हा परिषदेच्या ३९ गटातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच पंचायत समितीतील ७९ गणांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. 

जिल्हा परिषद गटातील स्थगित निवडणूक- न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेच्या १३ गटातील, तर पंचायत समित्यांच्या २५ गणातील निवडणुका रद्द झाल्या आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा, गर्रा,  मोहाडी तालुक्यातील कांद्री, डोंगरगाव, वरठी, लाखनी तालुक्यातील लाखोरी, मुरमाडी, केसलवाडा (वाघ), मुरमाडी (तुप.) येथील निवडणूक रद्द झाली आहे.

आरक्षण नाही तर मतदान नाही- सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालानंतर उर्वरित जागांवर निवडणूक होणार आहे. मात्र, ओबीसींच्या भूमिकेकडे अजूनही उमेदवारांचे लक्ष लागून आहे. ओबीसी आरक्षणातील जागांवरील निवडणुका होणार नसतील तर मतदान करायचे तरी कशाला, अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे. उमेदवार प्रचाराला गत आठवडाभरापासून फिरत असले तरी गुरुवारपासून ओबीसींच्या बोलण्याला सामोरे जाण्याचीही नामुष्की ओढवणार आहे.

पंचायत समिती गणातील रद्द झालेली निवडणूक- पंचायत समिती गणांतर्गत तुमसर तालुक्यातील साखळी, आंबागड, खापा, देव्हाडी, माडगी, मोहाडी तालुक्यातील पाचगाव, मोहगाव (देवी), पालोरा, साकोली तालुक्यातील कुंभली, वडद, सानगडी, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, केसलवाडा (वाघ), किटाडी, भंडारा तालुक्यातील कोथुर्ना, धारगाव, खोकर्ला, कोंढी, पहेला, पवनी तालुक्यातील चिचाळ, पिंपळगाव, कोदर्ली, तर लाखांदूर तालुक्यातील मासळ, भागडी, पिंपळगाव (कोहळी) या गणातील निवडणूक रद्द झाली आहे.

नगरपंचायतीत १६८ उमेदवार रिंगणात- मोहाडी, लाखनी व लाखांदूर येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३९ जागांसाठी १६८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मोहाडी नगरपंचायतीत ५८, लाखनी ६३, तर लाखांदूर येथे ४७ उमेदवार रिंगणात आहेत. मोहाडी येथे सुरुवातीला ७८, लाखनी येथे ७४, तर लाखांदूर येथे ६८ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे तिन्ही नगरपंचायत क्षेत्रातून २२० उमेदवारांनी २५६ अर्ज दाखल केले होते. आता १६८ उमेदवार रिंगणात असून, प्रभागनिहाय प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणुका होणार नसल्याने प्रचारातील उत्सुकता संपल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदOBCअन्य मागासवर्गीय जाती