शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

फरार डॉ. देवेश अग्रवालची अखेर न्यायालयात शरणागती

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 29, 2025 15:01 IST

अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफी कक्षात अनैतिक कृत्य केल्याचा आरोप : २० दिवसांपासून होता फरार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अश्लील वर्तनाप्रकरणी अखेर आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याने भंडारा न्यायालयात सोमवारी, २८ जुलैला सायंकाळी आत्मसमर्पण केले. मागील २० दिवसांपासून तो फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केला होता. 

९ जुलै रोजी साकोलीतील श्याम हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेत पीडित मुलगी आईसोबत उपचारासाठी आली असताना डॉक्टर देवेश अग्रवाल याने सोनोग्राफीच्या नावाखाली आई व परिचारिकेला बाहेर पाठवले. त्यानंतर एकांतात मुलीसोबत अश्लील वर्तन करत मोबाईल क्रमांक मागितला आणि गुप्तता राखण्याची धमकी दिली, असे पीडितेच्या तक्रारीत नमूद आहे. डॉक्टरने याआधीही पीडितेला इंस्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, हे सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर मुलीने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि यावरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात डॉ. देवेश अग्रवाल याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४ (२)(क), ६५ (१), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ४, ६, ८ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३(२)(५) अन्वये गुन्हा दाखल झाला. आरोपीला मदत केल्याप्रकरणी त्याचा भाऊ भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांनाही आरोपी करण्यात आले होते.

फरार आरोपीच्या शोधासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष ७ पथके स्थापन करून गोंदिया, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई ते हैदराबादपर्यंत शोध मोहीम राबवली होती. लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती, तर वायरलेस संदेशाद्वारे देशभरातील पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. 

आरोपीच्या पीसीआरची मागणीभंडारा पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणातील अनेक महत्वाचे तपास करायचे असल्याचे डॉ. देवेश अग्रवाल याला ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे केला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा