शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दाेन लाख ८० हजार व्यक्ती निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:44 IST

भंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी आतापर्यंत तपासणी केलेल्या तीन लाख २९ हजार ८५७ व्यक्तींपैकी तब्बल ...

भंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी आतापर्यंत तपासणी केलेल्या तीन लाख २९ हजार ८५७ व्यक्तींपैकी तब्बल दाेन लाख ७९ हजार ८७५ व्यक्तींचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. चाचणीच्या तुलनेत आतापर्यंत १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲन्टिजन चाचणी करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असून, सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मृताचा आकडाही वाढत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत दिलासादायक बाब म्हणजे काेराेना चाचण्यांच्या तुलनेत केवळ १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळत आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात ही टक्केवारी दहाच्याही आत हाेती; मात्र गत दाेन महिन्यांपासून काेराेना संसर्ग वाढल्याने टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मार्च २०२० पासून काेराेना चाचण्यांना सुरुवात झाली आतापर्यंत तीन लाख २९ हजार ५४८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर ५७ हजार ८९०, ॲन्टिजन २ लाख ७१ हजार ३७२ आणि टीआरयू- एनएटी २८६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ८४.९३ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सुरुवातीच्या काळात अनेकांनी चाचण्यांची धास्ती घेतली हाेती. पाॅझिटिव्ह आलाे तर काय? असा प्रश्न निर्माण झाला हाेता. गत दाेन महिन्यात काेराेना संसर्ग वाढल्याने सर्दी पडसा झालेले आणि बाहेरगावाहून आलेले व्यक्तीही तत्काळ काेराेना चाचणी करून घेत असल्याचे दिसत आहे. अलीकडे आरटीपीसीआर चाचण्या कमी प्रमाणात करण्यात येत असून, ॲन्टिजन चाचण्यावर भर आहे. अनेक जण एचआरसीटी स्कॅन करून आपला स्काेर पाहत आहे. चाचण्यांच्या तुलनेत पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण कमी असणे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.

बाॅक्स

गुरुवारी ३४ मृत्यू १११० पाॅझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात गुरुवारी ३४ जणांचा काेराेनाने मृत्यू तर १११० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ३४ मृत्यूमध्ये भंडारा तालुक्यातील १६, तुमसर आणि पवनी येथे प्रत्येकी ३ साकाेलीत सहा, लाखनी पाच, माेहाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर १११० पाॅझिटिव्ह व्यक्तींमध्ये भंडारा तालुक्यातील ४०५, माेहाडी ६३, तुमसर १५३, पवनी १६८, लाखनी ५७, साकाेली २१५ आणि लाखांदूर तालुक्यातील ४९ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यापैकी ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या आहेत. तर ८१७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १५ हजार ९४०, माेहाडी ३१५२, तुमसर ४६९७, पवनी ४३७६, लाखनी ४१०७, साकाेली ३५७०, लाखांदूर १९५१ व्यक्तींचा समावेश आहे. तर ८१७ मृत्यूमध्ये भंडारा ४०२, माेहाडी ७४, तुमसर ९०, पवनी ८६, लाखनी ६१, साकाेली ६७, लाखांदूर ३७ व्यक्तींचा समावेश आहे.