शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आॅनलाईन लॉटरी सेंटरवर धाड

By admin | Updated: March 10, 2016 00:48 IST

शहरात मागील काही दिवसांपासून आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली तरुण बेरोजगार लोकांना आमिष दाखवून जुगार खेळ चालविला जात असल्याची चर्चा होती.

३.५ लाखांचे साहित्य जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईभंडारा : शहरात मागील काही दिवसांपासून आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली तरुण बेरोजगार लोकांना आमिष दाखवून जुगार खेळ चालविला जात असल्याची चर्चा होती. परंतु आॅनलाईन लॉटरी सेंटर चालविणाऱ्या लोकांकडे लॉटरी सेंटर चालविण्याचा अधिकृत परवाना असल्याबाबत लॉटरी सेंटर मालकांकडून सांगण्यात येत होते. परंतु शहरात आॅनलाईन लॉटरी सेंटरवर आॅनलाईन लॉटरी ही चार अंकी न खेळता फक्त दोन अंकामध्ये खेळवित होते. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज धाड घातली. सदर प्रकार हा आॅनलाईन लॉटरीमध्ये न मोडता सरळ सट्टापट्टी, मटका या प्रकारात जुगारात मोडत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील मोठा बाजार परिसरातील नगरपरिषद चाळीमधील शर्मा आॅनलाईन लॉटरी दुकान तसेच पोष्ट आॅफीस चौकातील तुरस्कर कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील राजश्री आॅनलाईन लॉटरी सेंटरवर धाड घातली असता दोन्ही आॅनलाईन लॉटरी दुकानात असलेल्या संगणकांवर आॅनलाईन लॉटरी बुकिंगचे काम सुरु होते. सदर दोन्ही आॅनलाईन लॉटरी दुकानात भिंतीवर दोन अंकी चार्ट लिहिलेले दिसून आले. दुकानातील चालू संगणकांची पाहणी केली असता नियमाप्रमाणे चार अंकी आकड्यांवर बुकिंग न होता आॅनलाईन लॉटरी दुकानामधील संगणक आॅपरेटर हे दोन अंकी आकड्यावर लॉटरीची बुकिंग करून त्याचा निकाल समोरच्या भिंतीवरील चार्टवर दोन अंकामध्ये प्रदर्शीत करीत असल्याचे तसेच दोन अंकी आकड्यावर आॅनलाईन लॉटरी लावून त्या मोबदल्यात लोकांकडून पैसे घेऊन आॅनलाईन लॉटरीची जुगार खेळणारे इसम दोन अंकी आकड्यावर दोन रुपयाप्रमाणे युनिट चार्ज घेत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र लॉटरी अधिनियमान्वये चार अंकी लॉटरी घेणे बंधनकारक असताना सुद्धा शेवटचे दोन अंक घेऊन दोन अंकांमध्येच लॉटरी खेळली जाते. गोल्डन आॅनलाईन लॉटरी दुकानाचे मालक जयकुमार श्रीकिशन शर्मा, रा.पटेलपुरा वॉर्ड भंडारा व आॅनलाईन लॉटरी बुकींग करणारे संगणक आॅपरेटर नरेश नंदनवार, रा.बेला, तसेच राजश्री आॅनलाईन लॉटरी दुकानात दोन अंकी आॅनलाईन लॉटरी बुकींग करणारे संगणक आॅपरेटर विजू खेताडे रा.संत लहरी बाबा वॉर्ड, भंडारा, चित्रेश बहेकर रा.बाजार चौक गणेशपूर, कामेश टांगले रा.भोजापूर, गोवर्धन शिवरकर भोजापूर व दोन अंकी आॅनलाईन लॉटरी लावणारे रवी पन्नालाल रगडे रा.कपील नगर, भंडारा, रामकुमार निमजे रा.भगतसिंग वॉर्ड नवीन टाकळी, पुरुषोत्तम सेलोकर रा.रामनगर खात रोड भंडारा, विलास देशकर रा.भगतसिंग वॉर्ड नवीन टाकळी, सैय्यद अकराम सैय्यद मेहमुद अली रा.जमनालाल बजाज वॉर्ड भंडारा, रामरतन पडोळे रा.नेरी, दिलीप खोब्रागडे रा.गणेशपूर भंडारा, दिलीप हटवार रा.भंडारा, सलमान अक्रम खान रा.तकीया वॉर्ड भंडारा या सर्वांवर कारवाई केली. त्यांचेकडून दोन अंकी लॉटरी लावण्याचे संगणक व साहित्य कि. २,७०,००० रु. व नगदी ८१,४३० असा एकुण ३,४९,४५० रु. चा माल जप्त करण्यात आले. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, सपोनि रिजवी, सफौ राहांगडाले, पोहवा मडामे, नंदनवार, राजेश गजभिये, रोशन गजभिये, बबन अतकरी, चेतन पोटे, स्नेहल गजभिये, रमाकांत बोंद्रे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)