शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीच्या रेल्वे फाटकावरून तरुणीला सिनेस्टाइल नेले पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:19 IST

वडील म्हणतात, अपहरण : पोलिसांकडून जिल्हाभर नाकाबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : टेलरकडून कापड घेऊन मैत्रिणीसोबत स्कूटीने घरी परतणाऱ्या एका २५ वर्षीय युवतीचे देव्हाडी येथील रेल्वे फाटकावरून तीन युवकांनी सिनेस्टाइल अपहरण केले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. मात्र, शोध लागला नाही.

देव्हाडी येथील गांधी वॉर्डात राहणाऱ्या संबंधित तरुणीच्या पालकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ही अपहृत तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत स्कूटीने देव्हाडी येथील टेलरकडे शिवलेले कापड आणण्याकरिता गेली होती. कापड घेऊन घरी परत येताना रेल्वे फाटकावर थांबली. दरम्यान, प्रशांतचंद राजपूत ऊर्फ मकालू (२५, गांधी वॉर्ड देव्हाडी) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी तरुणीला बळजबरीने उचलून चारचाकी वाहनात कोंबले आणि पलायन केले. पोलिसांनी या तक्रारीवरून तातडीने तपासाची चक्रे फिरविली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून वायरलेसवरून सर्वत्र माहिती देऊन जिल्ह्यातील सर्व महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत ती नकाबंदी सुरू होती. मात्र, तपास लागला नाही. दरम्यान, जिल्हा पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देव्हाडी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी तुमसर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ८७, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"देव्हाडी येथील घडलेली घटना ही प्रेमप्रसंगातून घडली असे तिच्या मैत्रिणीचे बयाण आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. तपासासाठी पथक रवाना केले जात आहे. लवकरच शोध घेतला जाईल." - ईश्वर कातखेडे, जिल्हा पोलिस उपअधीक्षक, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडारा