शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

राजीव गांधी चौकात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, महिला ठार, भाऊ जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 20, 2024 12:19 IST

ही घटना रात्री सव्वा दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली

गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: शहरातील वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण भावाला भरधाव टिप्परची धडक बसली. यात अफसाना शेख (३५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ कलीम शेख (४०) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोचला. मात्र पोलिसांच्या समसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. ही घटना रात्री सव्वा दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.

एमएच ३६ एए ३३८१ क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. राजीव गांधी चौकातून एमएच ३६ टी ९८०१ क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहिण भाऊ रुग्णालयातून घरी जात होते. दरम्यान या चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. या दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट घासत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर कलीम शेख याच्या पायाचा अक्षरशः चुरा झाला.

अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केले.दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने मारहाण केली. त्याने जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. चालकाचे नाव कळू शकले नाही.

अपघातानंतर तणाव

या अपघाताची माहिती पसरतात शेकडोंच्या संख्येने जमाव चौकात पोहोचला. टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. जादा पोलीस कुमक मागवून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त चौकात तैनात होता.

टॅग्स :Accidentअपघात