शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

राजीव गांधी चौकात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; एक महिला ठार

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 20, 2024 06:05 IST

अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोचला. मात्र पोलिसांच्या समसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला.

भंडारा : शहरातील वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण भावाला भरधाव टिप्परची धडक बसली. यात अफसाना शेख (३५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ कलीम शेख (४०) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोचला. मात्र पोलिसांच्या समसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. ही घटना रात्री सव्वा दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.

एमएच ३६ एए ३३८१ क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. राजीव गांधी चौकातून एमएच ३६ टी ९८०१ क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहिण भाऊ रुग्णालयातून घरी जात होते. दरम्यान या चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. या दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट घासत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर कलीम शेख याच्या पायाचा अक्षरशः चुरा झाला. 

अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केले.दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने मारहाण केली. त्याने जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. चालकाचे नाव कळू शकले नाही.

अपघातानंतर तणावया अपघाताची माहिती पसरतात शेकडोंच्या संख्येने जमाव चौकात पोहोचला. टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. जादा पोलीस कुमक मागवून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त चौकात तैनात होता.

टॅग्स :Accidentअपघात