शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत साधी नाली केली नाही, थांबा आता दाखवतोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:57 IST

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारापासून रस्ता, नाल्या, पथदिवे अशा बाबींवरून धारेवर धरले जात आहे.  मागच्या वेळी मत मागताना मोठा गोड बोलत होता. सिमेंट रस्ता करून देऊ, नाल्याची साफसफाई नियमित करू, नळाला दररोज पाणी येईल, असे सांगत होता. विश्वास ठेवला. मत दिले. आता तुम्हीच सांगा पाच वर्षांत काय केले. दिसते कुठे रस्ता, झाली नाली साफ, अन्  चालले पुन्हा मत मागायला, असे शब्द आता रोजच ऐकायला येत आहेत.

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाऊ मेंबरले घरासमोरची नाली दुरुस्त करायला सांगितली. एकदा नाही दहादा सांगितले. सरपंचालाही सांगून बघितले. पाच वर्षांत साधी नाली दुरुस्त केली नाही. आता पुन्हा उभा आहे म्हणतो. थांबा दाखवतोच आता निवडणुकीत, असे संवाद आता गावागावांत ऐकायला येत आहेत. थंडीत शेकोटीवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पात सत्ताधाऱ्यांवरील रोष व्यक्त होत आहे. उमेदवारांची जुळवाजुळव करत असलेल्या  पुढाऱ्यांना गावकऱ्यांच्या बोलण्याला तोंड द्यावे लागत आहे.जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली. गावपुढारी योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत. काही ठिकाणी उमेदवारांची निवड झाली आहे. विरोधी गटाचा अंदाज घेऊन उमेदवार निश्चित करीत आहेत. दुसरीकडे गावात सध्या निवडणुकीच्याच चर्चा सुरू असून, पाच वर्षांत न झालेल्या कामाचा रोष त्यातून व्यक्त होत आहे. लहानसहान समस्या असल्या तरी त्या सुटल्या नाहीत म्हणून तोंडसुख घेतले जात आहे. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारापासून रस्ता, नाल्या, पथदिवे अशा बाबींवरून धारेवर धरले जात आहे. मागच्या वेळी मत मागताना मोठा गोड बोलत होता. सिमेंट रस्ता करून देऊ, नाल्याची साफसफाई नियमित करू, नळाला दररोज पाणी येईल, असे सांगत होता. विश्वास ठेवला. मत दिले. आता तुम्हीच सांगा पाच वर्षांत काय केले. दिसते कुठे रस्ता, झाली नाली साफ, अन्  चालले पुन्हा मत मागायला, असे शब्द आता रोजच ऐकायला येत आहेत. निवडणूक आहे, जाऊ द्या, म्हणून गावपुढारी दुर्लक्ष करीत आहेत. 

सरपंचपदाच्या उमेदवारीवरून ओढाताण - पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. त्यातही सरपंचपद अतिमहत्त्वाचे. प्रत्येक गावात सरपंच होण्यासाठी अनेक जण गुढग्याला बाशिंग बांधून आहेत. गावातील प्रभावी पॅनलकडून लढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जमले नाही तर काही झालेले तरी निवडणुकीत उभे राहायचेच, असा निर्धार आहे. त्यामुळे एका सरपंचपदासाठी दहा ते बारा जण उभे राहण्याची शक्यता दिसत आहे.

सुशिक्षित तरुणही उतरले निवडणुकीत- आपण भले आणि आपले काम भले असे म्हणणारे सुशिक्षित तरुणही आता निवडणुकीत उतरले आहेत. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात राहणारे तरुण आता गावात दिसू लागले आहेत. आपल्याच तोऱ्यात राहणारी आणि दुचाकीवरून फिरणारी ही मंडळी आता जमिनीवर आली असून, निवडणुकीत मोठ्या हिरिरीने भाग घेत आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक