शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक करताना मोपेड ट्रकला धडकली; एक ठार दुसरा गंभीर जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 2, 2024 17:55 IST

अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघेही मोपेडने (एम. एच.३६ ए.एम.१४२०) सिहोराकडे जात होते.

भंडारा : तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर डोंगराला शिवारातील माऊली पेट्रोल पंपसमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव मोपेड ट्रकला धडकली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान तुमसर येथे रुग्णालयात मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला भंडारा येथे रेफर करण्यात आले. हा अपघात मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडला. अतुल गुर्वे (३०, शहर वॉर्ड तुमसर) असे मृताचे, तर राम गुर्वे (३३, नवरगाव) असे जखमीचे नाव आहे.

अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघेही मोपेडने (एम. एच.३६ ए.एम.१४२०) सिहोराकडे जात होते. त्यांच्या दुचाकी समोर ट्रक (एच.आर. ३८ यू ०४०५) होता. दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या नादात अनियंत्रित होऊन समोरील ट्रकला धडकली. त्यात दुचाकीचा हँडल ट्रकच्या मागच्या भागात फसला, त्यामुळे दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. त्यात अतुल गुर्वे व राम गुर्वे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोन्ही जखमींना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारादरम्यान अतुल गुरवे याचा मृत्यू झाला.

पोलिसांना नागरिकांकडून या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस राकेश पटले सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. या अपघाताचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल कोल्हे करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे जीवघेणेतुमसर-बालाघाट या राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात आले आहे. हा मार्ग अपघातग्रस्त ठरला असून या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते वाचविण्याच्या प्रयत्नात या राष्ट्रीय महामार्गावर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. मागील एक वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. परंतु अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात दिसत नाही.

टॅग्स :Accidentअपघात