शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरवला वैभवशाली वारसा ! गोंडराजाचा वाडा गेला, उपजीविकेसाठी विकावी लागली पूर्वजांची शस्त्रास्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:03 IST

Bhandara : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात एकेकाळी जमिनदारी उपभोगलेले गोंड राजाचे वंशज तुकारामबापू पंधरे यांच्या मालकीचा जांभळी (खांबा) येथे दोन एकर परिसरात वाडा होता.

गोविंद हटवारलोकमत न्यूज नेटवर्क साकोली (भंडारा) : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात एकेकाळी जमिनदारी उपभोगलेले गोंड राजाचे वंशज तुकारामबापू पंधरे यांच्या मालकीचा जांभळी (खांबा) येथे दोन एकर परिसरात वाडा होता. त्या वाड्यात घोड्यांची बग्गी होती. तलवार, बंदुका आदी शस्त्रास्त्रे होती. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी जमीनदाराची स्वत:च्या मालकीची कैद होती. पण, आता या वाड्याच्या जागेवर आता फक्त झोपडी आणि लाकडी अवशेष शिल्लक आहेत. वारशापोटी मिळालेल्या बंदुका उपजीविकेसाठी विकाव्या लागल्या आणि तलवारी पुजेपुरत्या मर्यादित झाल्या आहेत. 

एकेकाळचे जमीनदार तुकारामबापू हरिसिंग पंधरे (मोकाशी) यांच्या पत्नी बजाबाई आणि भागूबाईच्या नावे १९६९-७० च्या रेकार्डनुसार पिटेझरी येथे ३४ एकर जागा आहे. परंतु, त्यांचा नातू भुवनशहाँ पंधरे यांच्या मालकीचे पिटेझरीत काहीच नाही.  त्यांच्या मालकीच्या काही जागांवर स्थानिकांनी अतिक्रमण केले. काहींना त्यांच्या पूर्वजांनी  घरे बांधण्यासाठी जागा दान केली. त्यानंतर उर्वरित जागा सरकारजमा झाली. त्याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी पिटेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय बनले. वनपालासाठी पडीत असलेले क्वाटर्स तयार झाले. आता जमिनीचे जुने गटनंबर बदलले गेले. त्यामुळे ही जागा माझ्याच आजीची होती, हे सिद्ध करण्यासाठी भूवनशहाँ शासकीय दरबारी खेटा मारत आहेत.

दहा वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू  

भूवनशहाँचे वडील रामचंद्रबापू पंधरे यांनी संबंधित जमिनींसदर्भात पत्रव्यवहार केला. २००० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा मुलगा भूवनशाँ केवळ दहा वर्षांचा होता. त्यामुळे वडिलोपार्जित जमिनीबाबत त्याला काहीही माहित नाही. रामचंद्रबापू यांचे मुनिम (पीए) छोटू पटले यांना मात्र याची खडानखडा माहिती आहे. पण, सरकारी बाबूंसमोर सामान्यांचे काही चालत नाही. कोर्टात जाण्याची ऐपत नाही. त्यामुळे सारे काही अधांतरी आहे. 

पांगळीच्या जमिनीसाठी कोर्टात धाव

पांगळीत ७५० एकर जमीन तुकारामबापू हरिसिंग पंधरे यांची होती. त्यावेळी भंडाऱ्याचे तत्कालीत पांडे महालाचे मालक यांनी त्या जागेवर दावा केला होता. त्यानंतर प्रकरण भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायालय गेले. १९१२ च्या निर्णयानुसार ही ७५० एकर जागेची मालकी तुकारामबापूंचे वडील हरिसिंग पंधरे यांची असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्या न्यायालयाच्या निकालाची प्रत भूवनशहाँ यांनी अजूनही जपून ठेवली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा