मग्रारोहयोने दिले ३० हजार मजुरांना काम : ५४० ग्रामपंचायतीत ८०१ कामे सुरूप्रशांत देसाई भंडारामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ९१६ मजूरांची नोंद झाली आहे. मजूरांना त्यांच्या हक्काची मजूरी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार ५९० क्रियाशील मजुरांपैकी २ लाख ३८ हजार ३०२ मजुरांचे बँक खाते आधार कॉर्डशी जोडण्यात आले आहे. ५४० ग्रामपंचायतीतून ८०१ कामे सुरू असून यात ३० हजार १११ मजूरांना रोजगार मिळाला आहे.केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ‘मागेल त्याच्या हाताला काम’ योजना अस्तित्वात आणली आहे. ज्या गावात कामे असतील तिथे मजूरांना कामे देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५ लाख ६३ हजार ९१६ मजुरांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी २ लाख ४८ हजार ५९० मजूर क्रियाशिल आहेत. सर्वकश सहभाग नियोजन प्रक्रियेत जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याने ग्रामीण भागातील ९३ हजार ८४६ कुटुंबातील १ लाख ७४ हजार ८८६ मजूरांना काम उपलब्ध करून देण्यात आले असून सुमारे ४५.४२ लाख मनुष्यदिन निर्मिती झालेली आहे. या बदल्यात मजूरीवर ६३०४.७२ लाख व कुशल साहित्यावर १४५७.०१ लाख खर्च झालेला आहे. मग्रारोहयोत ६५ टक्के कृषी व ३५ टक्के कामे अन्य प्रकाराची करावयाची आहे. वैयक्तिक लाभधारकाच्या शेतात सिंचन विहिरीची योजना असून जिल्ह्यात १ हजार ७५६ सिंचन विहिरींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी १ हजार ४३६ लाभार्थ्यांच्या प्रस्तावामध्ये सिंचन विहिरींकरिता भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ६४२ प्रस्तावांना तांत्रिक मान्यतेकरिता असून २२० प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाची कामे घेण्याकरिता २९३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आले आहे. ४७३ शौचालयाची कामे सुरू आहेत. मनरेगात घरकुल, शेततळे, नाला सरळीकरण, गाळ उपसणे, जमिन सुधारना मजगीची कामे, वृक्षसंगोपन, पाटबंधारे नहर दुरूस्ती, आदी कामे करण्यात येत आहे.
९६ टक्के मजुरांच्या बँक खात्यांना आधारची ‘लिंक’
By admin | Updated: March 2, 2016 01:22 IST