शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
3
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
4
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
5
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
6
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
7
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
8
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
9
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
10
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
11
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
12
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
13
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
14
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
15
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
16
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
17
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
18
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
19
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
20
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

जलयुक्त शिवारची ८६ गावे ‘वॉटर न्युट्रल’

By admin | Updated: April 21, 2017 00:39 IST

महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.

सातही तालुक्यातील गावांचा समावेश : तर सिंचनक्षेत्रात होणार वाढभंडारा : महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २०१५-१६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ८६ गावांपैकी ८६ गावे शंभर टक्के ‘वॉटर न्युट्रल’ झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये एकूण ८६ गावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुका-१५, तुमसर-१९, मोहाडी-१५, पवनी-१२, लाखांदूर-६, साकोली-१० व लाखनी ९ अशा ८६ गावांचा समावेश होता. या गावात एकूण प्रस्तावित १३७० कामांपैकी १११९ कामे पूर्ण झाली आहेत.शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युर्ट्रल टक्केवारी होय. प्रकल्प आराखड्यानुसार सन २०१५-१६ अंतर्गत निवडलेल्या गावांपैकी वॉटर न्युट्रल टक्केवारीनुसार ८६ पैकी ८६ गावे शंभर टक्के "वॉटर न्युट्रल" झालेली आहेत. शंभर टक्के वॉटर न्युट्रल झालेली गावे तालुकानिहाय भंडारा-माटोरा, कवलेवाडा, पलाडी, गोलेवाडी, इटगाव, मानेगाव, नवरगाव, खुर्शीपार, गराडा बु., गराडा खु., मंडणगाव, सिल्ली, मकरधोकडा, खमारी बु., व मांडवी. मोहाडी- मोहगाव, बच्छेरा, टांगा, देवाडा बु., नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव (क), कांद्री, शिवणी, खैरलांजी, बोरी (क), करडी, उसर्रा. तुमसर- गर्रा बघेडा, दावेझरी (सी), आसलपाणी, मेहगाव, साखळी, चिखला, कोष्टी, खापाखुर्द, गोंडीटोला, पवनारा, गोबरवाही, पवनारखारी, सितासावंगी, कार्ली, रोंघा, आलेसूर, लेंडेझरी, नवरगाव, येरली. पवनी- मिन्सी, पन्नासी, भिकारमिन्सी, शेगाव, चकारा, सुरबोडी, चिचाळ, अड्याळ, कमकाझरी, तिर्री, कलेवाडा, खैरी. साकोली- सातलवाडा, रेंगेपार, सालेबर्डी, जांभळी, मालूटोला, उसगाव, पार्थी, बरडकिन्ही, सेंदुरवाफा, पळसगाव. लाखनी- मोरगाव, खैरी, पिंपळगाव, सिपेवाडा, ढिवरखेडा, मेंढा/भूगाव, केसलवाडा, राजेगाव, झरप. लाखांदूर- तावशी, टेंभरी, कुडेगाव, तई बु., आसोला व इटान अशा ८६ गावांचा समावेश आहे. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची निवड करण्यात आली असून या गावात २३७९ कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अनेक कामांना सुरुवात झाली असून ते प्रगतीपथावर आहे. जलयुक्त शिवारमुळे गावांच्या सिंचन क्षमतेत निश्चितच वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)