शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यातील ८५० आदिवासी कुटुंब भूमिहीन

By admin | Updated: October 7, 2014 23:28 IST

शासनाच्या नियमानुसार आठ मुद्यांपैकी सात मुद्यांची पूर्तता शासनाने केली. परंतु पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख एक लाख रक्कम अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना मिळाली नाही. शंभर टक्के आदिवासी गाव

व्यथा आदिवासींची : मोबदल्यापासून वंचिततुमसर : शासनाच्या नियमानुसार आठ मुद्यांपैकी सात मुद्यांची पूर्तता शासनाने केली. परंतु पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख एक लाख रक्कम अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना मिळाली नाही. शंभर टक्के आदिवासी गाव कमकासूर व सुसुरडोह येथील ८५० कुटुंब भूमिहीन झाली आहेत. या उध्दवस्त कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप येथील नागरिकांनी लावला आहे. सुसुरडोह तथा कमकासूर ही गावे बावनथडी प्रकल्पगात सन १९८२-८३ मध्ये समाविष्ट करण्यात आले. शंभर टक्के आदिवासी या गावांचे पुनर्वसन गर्रा बघेडा येथे नवीन गावठानात करण्यात आले. पुनर्वसन होऊन तीन वर्षे झाली तरी पर्यायी शेतजमिनीऐवजी एक लाख रोख रक्कम शासनाने दिली नाही. २१ फेब्रुवारी २०१४ ला जिल्हाधिकाऱ्यांनी सभा घेऊन आठ दिवसात रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती. २८ आॅगस्ट २०१४ ला भंडारा येथे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधींची पुनर्वसन अधिकारी यांच्यात चर्चा होऊन गावाला भेट देण्याचे ठरले होते. परंतु आजपर्यंत कोणताच अधिकारी गावाकडे फिरकले नाहीत.प्रकल्पग्रस्तांकडे दोन ते ७० एकर शेती शेतकऱ्यांकडे होती. शासनाने जमिनीचा अत्यल्प मोबदला दिला. परंतु या मोबदल्यात पुनर्वसन स्थळी शेती विकत घेता येत नाही. शासनाने प्रती कुटुंब २.५० एकर शेती देण्याची मागणी केली आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा कायदा येथे पायदळी तुडवला जात आहे. आदिवासींना येथे भूमीहीन करण्यात आले आहे. शासनाने केवळ ३५ हजार एकर या भावाने शेतीचा मोबदला दिला आहे.सन २००६-२००७ मध्ये काही कुटुंबांना ओटे व देवघरे यांच्याकरिता ५० हजार देण्याचे आश्वासन दिले होते. ती रक्कम अजून दिली नाही. एका घरकुल बांधकामाकरिता ६८,५०० रक्कम देते. २२७ भूखंड घराकरिता प्रत्यक्ष दिले असनू २२८ भूखंड दिल्याचे अधिकारी सांगत आहेत. नियमानुसार २० टक्के अतिरिक्त भूखंड दिले नााही. प्रकल्पग्रस्त कमकासूर व सुसुरडोह येथील कुटुंबाचा बीपीएल यादीत नावेच नाहीत. येथील अनेक कुटुंब स्थलांतरीत जीवन जगून उपजिवेकेकरिता इतरत्र गेल आहेत. १८ नागरिक सुविधांची येथे पूर्तता शसनाने केली नाही. वाढीव कुटुंबांना येथे भूखंड दिले नाही. दि. ९ मे २०१२ ला जिल्हाधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता यांनी पुनर्वसनस्थळी घरांसमोर खोलगट भागात मुरुम टाकून देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. आधी पुनर्वसन व नंतर धरण या नियमाला येथे हरताळ फासला गेला आहे. कागदोपत्री येथे अधिकाऱ्यांनी सर्व निपटारा केल्याचे प्रत्यक्ष पुनर्वसनस्थळी भेट दिल् यावर दिसून येते. परंतु मांजरीच्या गळ्यात कोण घंटी बांधणार अश्ी येथील स्थिती आहे. या सर्व मूलभूत समस्यांचा निपटारा करण्याची मागणी सरपंच किशोर उईके, ग्रा.पं. सदस्य दिनेश मरस्कोल्हे, माजी सरपंच झनकलाल उईके, बेनीराम धुर्वे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)