शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, कर्मचाऱ्यांची ८०७ पदे रिक्त; पदभरतीअभावी प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:14 IST

प्राथमिक शिक्षणाचा पाया कमकुवत : कसे मिळणार दर्जेदार शिक्षण?

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचे जाळे विणले गेले आहे. परंतु, अलीकडे पदभरतीअभावी प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात वर्ग ३ कर्मचाऱ्यांची ८०७ पदे रिक्त आहेत. प्रभारावर शिक्षण विभागाचा डोलारा सुरू आहे. परिणामी ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात वर्ग ३ कर्मचाऱ्यांची ३,४२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २६१६ पदे भरली असून ८०७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, उच्च श्रेणी माध्यमिक शिक्षक, निम्न श्रेणी माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा परिचर आदी पदांचा समावेश आहे.

रिक्त पद भरतीची मागणी वारंवार होत आहे; परंतु शासन-प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. रिक्त पदांचा कारभार प्रभारावर चालविला जात आहे. शिक्षणाचे मूलभूत कार्य मागे पडत असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा कमालीने घसरत चालला आहे.

माध्य., महाविद्यालयीन शिक्षण अडचणीतकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची ६२ पदे, उच्च श्रेणी माध्यमिक शिक्षकांची ११५ पदे, निम्न श्रेणी माध्यमिक शिक्षकांची ७९ पदे रिक्त आहेत. पूर्वी घड्याळी तासिकाप्रमाणे शिक्षकांना शासनाकडून मानधन मिळायचे. परंतु, तेही मिळत नसल्याने आता जिल्हा निधीतून पैसा दिला जात आहे.

प्राथमिक शिक्षकांची ४७६ पदे रिक्तजिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या २,६१२ पदांना मान्यता आहे. सद्यस्थितीत २,१३६ पदे भरली असून ४७६ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गरिबांच्या मुलांना शिक्षित करण्याची मुख्य जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर असते. परंतु, रिक्त पदांमुळे प्राथमिक शिक्षणाचा पायाच ढासळत चालला आहे.

"शासन प्राथमिक शिक्षणासाठी पैसा देत नाही, पदभरती करीत नाही. शासनाकडे रोहयो कुशल कामांसाठी पैसा नाही, मोदी आवास योजनेसाठी निधीचा ठणठणाट आहे. पूर्वी घड्याळी तासिकाप्रमाणे शिक्षकांना मिळणारे शासनाचे मानधन बंद झाले. त्यासाठी आता जिल्हा निधीतून पैसा द्यावा लागत आहे. गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहावी का?" - रमेश पारधी, सभापती, शिक्षण विभाग, भंडारा.

गटशिक्षणाधिकाऱ्यांची ६ पदे रिक्त जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या ७ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. केवळ पवनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्याचे पद भरले गेले आहे. उर्वरित सहा रिक्त पदांचा प्रभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज ढेपाळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वर्ग ३ ची मंजूर, भरलेली व रिक्त पदेपदाचे नाव                         मंजूर                       भरलेली                 रिक्तविस्तार अधिकारी (शिक्षण)     १२                            ०७                         ०५कनिष्ठ विस्तार अधिकारी        १९                            १६                           ३ केंद्र प्रमुख                             ६०                            २२                         ३८ उच्च श्रेणी मुख्याध्यापक         १२५                          १२१                          ४ प्राथमिक शिक्षक                  २६१२                        २१३६                      ४७६ मुख्याध्यापक                        ३०                            २८                           २ उप मुख्याध्यापक                   ०१                            ०१                           ० पर्यवेक्षक                                ०६                             ०                           ०६ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक      ९५                            ३३                          ६२ उच्च श्रेणी माध्य. शिक्षक          २३१                           ११६                        ११५ निम्न श्रेणी माध्य. शिक्षक           १८७                          १०८                         ७९प्रयोगशाळा सहायक                 १३                             ८                            ५ प्रयोगशाळा परिचर                   ३२                            २०                          १२

 

टॅग्स :bhandara-acभंडाराzp schoolजिल्हा परिषद शाळा