शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी २५ आॅगस्टचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:44 IST

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ आॅगस्टपर्यंत पूर्ण न करणाऱ्या बँकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाखाचे कर्ज वाटप झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्ह्यात ७८ टक्के कर्ज वाटप, आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ आॅगस्टपर्यंत पूर्ण न करणाऱ्या बँकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाखाचे कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वितरणाची टक्केवारी ७८ टक्के आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ब्रिजकुमार तसेच विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ९६ टक्के कर्ज वाटप केले आहे. ज्या बँकांनी ५० टक्क्यापेक्षा कमी कर्ज वाटप केले त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक निहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला. ज्या बँकांनी उद्दिष्ट पूर्ण केले नाही. अशा बँकांना उद्दिष्टपूर्तीसाठी २० दिवसाचा अवधी दिला असून यासाठी शाखा व्यवस्थापकाकडून उद्दिष्ट पूर्ण करुन घेण्यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकांनी समन्वयाची भूमिका पार पाडावी, असे सांगितले.पुढील बैठकीत उद्दिष्टय १०० टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकेने आतापर्यंत केलेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेतला. जिल्हा सहकारी बँक, बँक आॅफ बडोदा, युनियन बँक यांनी निर्धारित वेळेत चांगले उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे त्यांचे कौतुक केले. परंतु ज्या बँकांनी अजूनपर्यंत निर्धारित उद्दिष्टय पूर्ण केले नाही. त्यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरवपीक कर्ज वाटपाच्या कामात जिल्हा प्रशासन सर्व बँकांना सहकार्य करेल. जे चांगले काम करतील त्यांचा प्रशासन सत्कार करेल व ज्यांचे काम समाधानकारक नसल्यास त्यांना कारवाईस सामोर जावे लागेल, असे निर्देश त्यांनी दिले. असमाधानकारक काम करणाºया बँकांच्या मुख्यालयास व मुख्यमंत्री कार्यालयास तक्रार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी