घरी आणल्यानंतर प्रा. जगदीश ब्राह्मणकर यांनी त्यांची काळजी घेतली. त्यांना एक महिना ऑक्सिजनवर ठेवत त्यांची पूर्ण व्यवस्था घरीच केली गेली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर व घरातील सर्व लोकांच्या सहकार्यानेच ते पूर्णपणे बरे झाले. ते म्हणाले की, मी दवाखान्यात होतो, तेव्हा प्रत्यक्ष मृत्यूला अनुभवले. पण, मी जगण्याची आशा मात्र सोडली नव्हती. मुलांनी घरी माझी उत्तम काळजी घेतली व सकारात्मक विचारानेच मी आता ठणठणीत बरा झालो आहे. योग, प्राणायाम व आयुर्वेदावर प्रचंड विश्वास असणारे ज्येष्ठ नागरिक वामनराव ब्राह्मणकर यांनी प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देत कोरोनावर विजय मिळला. कोरोनावर मात करताना वय आड येत नाही तर त्यावेळी सकारात्मक विचारांसह आत्मविश्वासाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले .
प्रचंड इच्छाशक्तीने ७८ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST