शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत ७७ टक्के मतदान

By admin | Updated: July 26, 2015 00:54 IST

आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या १४८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूकीसाठी आज (शनिवारी) शांततेत मतदान पार पडले.

उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद : १४९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक, सोमवारी मतमोजणीभंडारा : आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या १४८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूकीसाठी आज (शनिवारी) शांततेत मतदान पार पडले. यात ७९ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले असून दि.२७ रोजी (सोमवारी) संबधित तालुका मुख्यालय स्थळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे चार सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीपैकी सात ग्रामपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. दोन ग्रामपंचायतीतील पोटनिवडणूक पुर्णत: बिनविरोध करण्यात आली. त्यामुळे आता १४९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक घेण्यात आली. साकोली : तालुक्यातील २० ग्रामपंचायतीकरिता आज मतदान घेण्यात आले. यात एकूण ५३ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या निवडणुकीसाठी एकूण २१ हजार १८४ मतदार असून यात पुरुष मतदाराची संख्या १० हजार ९८४ तर महिला मतदारांची संख्या १० हजार २०० एवढी आहे. आज मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही व मतदान शांततेत पार पडले. दि. २७ ला शासकीय तंत्रनिकेतन सेंदूरवाफा येथे मतमोजणी होणार आहे. भंडारा : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीकरिता झालेल्या मतदानात ग्रामस्थांनी हिरीरीने भाग घेतला. भंडारा तालुक्यात मतदानाची टक्केवारी ८१ टक्के इतकी राहिली. मतदान केंद्रांवर सकाळपासुनच मतदारांची गर्दी दिसून आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.लाखांदूर : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीकरिता आज मतदान घेण्यात आले. तालुक्यात ८३.८१ टक्के मतदान झाले. बेलाटी येथे एका जागेकरिता शांततेत मतदान पार पडले. बेलाटी येथे आठ उमेदवार अविरोध निवडून आल्याने फक्त एका जागेकरिता आज शांततेत मतदान झाले. परिसरात रोवणीची कामे अत्यंत वेगाने सुरु झाली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच महिला मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. परंतु ११ वाजताच्या नंतर मात्र पुरुष मतदार अधिक संख्येने मतदान केंद्रावर येत होते. लाखनी : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीकरिता जवळपास ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशिल मतदान केंद्रावर पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. पवनी : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीकरिता ७५ टक्के मतदान झाले. दुपारी १२ वाजतापर्यंत मतदानाचे प्रमाण ४० टक्यापर्यंत होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात आले होते.मोहाडी : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीकरिता ६० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील मतदानाच्या टक्केवारीत मोहाडी तालुका पिछाडीवर आहे. तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत पार पडले.तुमसर : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक तथा दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक घेण्यात आली. यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. निवडणूक शांततेत पार पडली. स्टेशन टोली, मांढळ (दे), चुल्हाड, आंबागड येथे निवडणुकीत चुरस दिसून आली. सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. मांढळ (दे.) येथे ८५ टक्के मतदान झाले. तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून स्टेशनटोली (दे.) येथे ८५ टक्के मतदान झाले. तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून स्टेशनटोली (दे.) ची ओळख आहे. येथे ६७ टक्के मतदान झाले.मांढळ, तुडका, स्टेशनटोली, आंबागड, चुल्हाड, आलेसूर, चिचोली येथील तुल्यबळ लढती रंगल्या. उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पडद्यामागून भूमिका वठविल्या. ग्रामपंचायत निवडणुकीला पूर्वीपेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतींना राज्य व केंद्र सरकारचा सरळ निधी येत असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. युवक तथा महिला उमेदवारांनी या निवडणुकीत उत्साहाने सहभागी झाल्या. प्रस्थापितांना येथे धक्का मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (लोकमत न्युज नेटवर्क)जिल्ह्यातील या गावांमध्ये झाले मतदानभंडारा तालुका - कोंढी, करचखेडा, मानेगाव, गोलेवाडी, गुंथारा, धारगाव, खुटसावरी, सोनुली, टवेपार, कोका, भिलेवाडा, डव्वा, सालेबर्डी (पांधी), आंबाडी, लावेश्वर, माडगी, गराडा (बु.), खुर्शीपार, बेलगाव, माटोरा, पलाडी, गोपीवाडा, पहेला, बोरगाव (खु.), सर्पेवाडा, चोवा, चांदोरी, दाभा, टेकपार (डो.), राजेगाव, निमगाव, मांडवी, उमरी, पचखेडी, रावणवाडी.तुमसर तालुका - लेंडेझरी, आलेसूर, पिपरिया, चिचोली, आंबागड, पवनारखारी, येदरबुची, कवलेवाडा, पिपरा, पांजरा (रे.), स्टेशनटोली, तुडका, मांढळ, महालगाव, गोंडीटोला, पिपरीचुन्नी, सुकळी नकुल, चुल्हाड.मोहाडी तालुका -भिकारखेडा, जांभोरा, सालई खुर्द, ताडगाव, पारडी, खडकी, केसलवाडा, दहेगाव, पाहुणी, रोहा, पिंपळगाव (झं), कान्हळगाव (सि.), पिंपळगाव (का.), देव्हाडा (बु.), पांजरा (बोरी), मांडेसर, पाचगाव.पवनी तालुका - कोरंभी, वाही, मेंढेगाव, भोजापूर, धानोरी, पौना (खु.), मोहरी, पिलांद्री, उमरी, पौना (बु.), सावरला, केसलवाडा, कलेवाडा, कोसरा, खांबाडी, मिन्सी, ब्रम्ही, निलज, निष्ठी, धामनी, कातुर्ली, सेंडी (सौं.), तिर्री, भेंडारा, खातखेडा, कन्हाळगाव, सिरसाळा.लाखनी तालुका - सोमलवाडा, दैतमांगली, सिंदीपार, धाबेटेकडी, रामपूरी, डोंगरगाव (सा.), चान्ना, रेंगेपार (को.), परसोडी, लोहारा, रेंगोळा, खेडेपार, रेंगेपार (को.), किन्ही, सिपेवाडा, खैरी, पोहरा, शिवणी, झरप, सोनमाळा.साकोली तालुका - बोडदे, साखरा, चांदोरी, उसगाव, बोरगाव, खांबा, विर्सी, बाम्हणी, कटंगधरा, पळसपाणी, उमरझरी, परसटोला, घानोड, मोखे, शिवणीबांध, धर्मापुरी, उकारा, खैरी वलमाझरी, आमगाव (बु.), चारगाव.लाखांदूर तालुका - कन्हाळगाव, पुयार, सोनी, मांदेड, मुर्झा, पारडी, कोच्छी (दांडे), चिचोली, चिचाळ, बेलाटी, गुंजेपार.