इंद्रपाल कटकवारभंडारा : महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेग आणि खराब स्थितीमुळे वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गत पाच वर्षात जिल्ह्यात २,०२२ रस्ते अपघातात एकूण ७६७ जणांचा बळी गेला आहे. अनेकदा जनजागृती करूनही रस्ते अपघातात कमी झालेली नाही. या अपघातांमध्ये २,१४३ लोक जखमी झाले आहेत.
२०२२ मध्ये सर्वाधिक ४७८ अपघातांची नोंद झाली आणि २०२० मध्ये सर्वांत कमी ३०८ अपघातांची नोंद झाली. २०२० मध्ये कोविडमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे रस्ते अपघातांमध्ये घट झाली होती. पण यानंतर, २०२१ मध्ये अपघातांचा आकडा ७४ वरून ३८२ पर्यंत वाढला.
सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचेरस्ते अपघातात एक किंवा अधिक लोकांचा जागीच मृत्यू होतो तेव्हा त्याला 'प्राणघातक अपघात' म्हणतात. एकूण ७२२ अपघातांची नोंद करण्यात आली. २०२२ मध्ये ४७४, २०२३ मध्ये ४५४ आणि २०२४ मध्ये ४२६ जखमींची नोंद करण्यात आली. सर्वस्तरातून जनजागृती होणे नितांत गरजेचे झाले आहे.
२०२० मध्ये कमी तर २०२१ मध्ये सर्वाधिक जखमीजिल्हा वाहतूक विभागानुसार, गेल्या पाच वर्षांत, २०२२ मध्ये सर्वाधिक १७२ मृत्यू झाले. २०२० मध्ये १४५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्ये, हा आकडा १५२ वर पोहोचला. २०२३ मध्ये १५१ लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये १४७ लोकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये जखमींची संख्या सर्वाधिक ४२४ होती.
अपघातांचा आलेख वाढता२०२२ मध्ये ४७८ अपघात झाले, म्हणजे २६ ची वाढ झाली. तथापि, २०२३ मध्ये अपघातांचा आलेख ४१ वरून ४३७ वर आला. २०२४ मध्ये २० अपघातांची घट होत हा आकडा ४१७ वर आला.
"रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षात वाहतूक विभागाने १२ ठिकाणे निश्चित केली आहेत आणि वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. वाहनांचा वेग, सीट बेल्ट, हेल्मेट वापरणे नियम आहेत. मद्यपान करून गाडी चालविण्यास सक्त मनाई आहे. हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. अपघात टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे."- जितेंद्र बोरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक