शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा परिषदेच्या ७६५ प्राथमिक शाळा उद्या राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:31 IST

चर्चा फिस्कटली : बंदच्या निर्णयावर शिक्षक कृती समितीचे शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संचमान्यता व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा शासन निर्णय खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणारा आहे. परिणामी, दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७६५ प्राथमिक शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषद भंडारा शिक्षक समन्वय समितीने घेतला आहे.

यात २५ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी किरकोळ रजा टाकून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. हा मोर्चा नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा येथून दुपारी १२ वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. 

शिक्षकांनी मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालक्रिष्ण भुते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर काकिरवार, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष फारुख शहा, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश सातपुते महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज वंजारी, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद तिरपुडे, कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभू घरडे, जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक व इतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम झोडे यांनी केले आहे. 

अशा आहेत मुख्य मागण्या शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये, १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने अवास्तव अडचणी लक्षात घेता आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, शैक्षणिक कामाच्या निर्णयात शिक्षक संघटनासह चर्चा करून दुरुस्ती करावी, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब देण्यासाठी राबविलेली गणेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी, ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत तिथे स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करावी, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सर्वच पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, जुन्या पेन्शनचे आदेश निर्गमित करावे, अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना टेटचा शासन निर्णय रद्द करावा, आदी मागण्यांचा समावेश आहे

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाbhandara-acभंडारा