शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड होणार

By admin | Updated: June 11, 2016 00:33 IST

पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुरळीत करण्यासाठी १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासन राबविणार आहे.

विविध विभागांना उद्दिष्ट : सामाजिक वनीकरणाकडे रोपांची मागणी नोंदविण्याचे आवाहनभंडारा : पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुरळीत करण्यासाठी १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासन राबविणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बुधवारला झालेल्या बैठकीत सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.यासोबतच या कार्यक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असल्यामुळे स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता बचतगट, निसर्गप्रेमी मंडळ आदींचा सहभाग घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाने दिलेल्या उद्दिष्टानुसार स्थळांची माहिती, गाव, स्थळनिहाय समन्वयकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, अक्षांश, रेखांश, जागेचा जी.पी.एस. प्रणालीने काढलेला फोटो, खोदण्यात आलेल्या खड्डयाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहे.झाडे लावण्यासाठी प्रजातीनिहाय रोपांची मागणी सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदवावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी झाडे लावायची आहेत त्या ठिकाणी रोपे पोहचविण्यासाठी संपर्क अधिकारी नेमावे. २५ ते २९ जून या कालावधीत वृक्षारोपण करावयाच्या ठिकाणी रोपे पोहचविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.वृक्ष लागवडीची सर्व माहिती शुक्रवारपर्यंत आॅनलाईन अपलोड करावी, अशा सूचना निंबाळकर यांनी दिले आहेत. यावेळी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एन.आर.प्रविण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, सामाजिक वनीकरण सहाय्यक संचालक एन.डब्लू. कावळे तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) असे आहेत विभागनिहाय उद्दिष्ट१ जुलै रोजी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट याप्रमाणे, वनविभाग ७ लाख २३ हजार, सामाजिक वनीकरण १५ हजार, एफ.डी.सी.एम. १ हजार ७००, कृषी विभाग २० हजार, जिल्हा परिषद २५ हजार, आदिवासी आश्रम शाळा ३ हजार ५००, महसुल विभाग ५ हजार, आरोग्य विभाग ५ हजार, नगर परिषद आणि नगरपंचायत ८ हजार, पोलीस विभाग २ हजार, होमगार्ड ५ हजार, सिंचन विभाग १० हजार, सार्वजनिक बांधकाम २ हजार, अशोक लेलॅन्ड ५ हजार, मॉईल ५ हजार, सनफ्लॅग ५ हजार, कोब्रा बटालियन ५ हजार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, जनता, विद्यार्थी, कर्मचारी, स्वयंसेवी संघटना यांच्या सहकार्याने किमान ५ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.