शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ७४.८६ टक्के आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ डिसेंबरपर्यंत लसीकरणासाठी विशेष मोहीम म्हणून जिल्हाभर राबवण्यात  येत असलेल्या ‘मिशन लेफ्ट आउट’साठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आता दिसू लागली आहे. यात जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ७४.८६ टक्के आहे.जिल्ह्याच्या लसीकरणासाठी ८ लाख  ९८ हजार ४०० एवढे उद्दिष्ट असून त्यापैकी ८ लाख ६७ हजार ९४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, ६ लाख  ७२ हजार ५०२ नागरिकांनी दुसरा डोस  घेतला आहे.  एकूण १६ लक्ष ४० हजार ४४४ डोस देण्यात आले आहेत. आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी, मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी गल्लीपासून मोठ्या मोहल्ला भागात जाऊन पाहणी केली. आजच्या लसीकरणामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेतल्याने शहरातील व जिल्ह्यातील नारी शक्ती कोरोनापासून संरक्षित झाली आहे.प्रामुख्याने शहरातील बचत गटाच्या महिलांना  आज शहर उपजीविका केंद्र मिस्किन टॅक येथील  कार्यक्रमात लसीकरण करण्यात आले. लसीकरण आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी यांनी माहिती दिली. त्यानंतर सफाई कामगार वस्ती, चांदणी चौक येथेही लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. मुस्लिमबहुल वस्ती, मोहल्ला भागात विशेषत: महिलांची बैठक घेतली. या बैठकीवेळी   मोबाइल लसीकरण व्हॅनसुद्धा होती, त्यामुळे तिथेच लसीकरण करण्यात  आले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या