शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

७३८ कोटींच्या भंडारा शहराच्या बायपास महामार्गाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 11:51 IST

भंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.

ठळक मुद्देजमीन संपादनाची प्रक्रिया सुरू१४ किमीचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बायपास मार्गाला मंजुरी मिळाली असून हा बायपास १४ किमी. सहा पदरी राहणार आहे. रस्त्याचे बांधकाम, भुसंपादन व अन्य कामांसाठी ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जात असल्याने सर्व जड व प्रवासी वाहतूक याच मार्गावरून होते. जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील अनेक कार्यालये याच मार्गावर आहेत. त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. नागपूरहून निघालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्र.६) चार पदरी असला तरी मुजबी ते पलाडीपर्यंतचा रस्ता दोन पदरी असल्यामुळे शहरवासियांना त्याचा काहीच फायदा होत नव्हता. उलट अपघातात वाढ झाली होती. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होती.आता बायपासला मंजुरी मिळाली असून बांधकामाबाबत प्रकल्पाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. प्रस्तावित मार्ग शहापूर, बेला वरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगा नदीवर दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहे. सदर रस्ता गिरोला, भिलेवाडा मार्गाहून चारपदरी रस्त्याला येऊन मिळणार आहे. जमीन संपादनासाठी भारत सरकार तर्फे राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल.या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे.आर. जमिन १३ गावांमधून संपादीत करायची आहे. आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भुसंपादन व युटीलीटी शिफ्टिींगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.रस्ता सहापदरीकरणभंडारा बायपास रस्ता १४.८ किमी सहा पदरीकरणाचा राहणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, २ लहान पूल, २ वाहन भूमिगत रस्ते, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, १५ लहानमोठे पूल, १७ किमीचा सर्व्हिस रोड, ११ लहान जंक्शन, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.सदर बायपास रस्त्यामुळे नागरिकांना जड वाहतुकीची समस्या राहणार नाही. अपघाताचे प्रमाण कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बायपास रस्त्याची मागणी पूर्ण होणार आहे.-सुनील मेंढे,खासदार, भंडारा-गोंदिया.

टॅग्स :highwayमहामार्ग