शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील महामार्गासह ७२ ग्रामीण मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:16 IST

२२ मंडळांत अतिवृष्टी : अनेक घरांची पडझड

भंडारा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुराने मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील ७२ मार्ग बुधवारी सकाळपासून बंद पडले. गत २४ तासांत जिल्ह्यात ९४.०९ मिमी पाऊस कोसळला असून २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेकडो घरात पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. दिवसभर विश्रांतीनंतर मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. २४ तासांत ९४.०९ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक १९० मिमी पाऊस तुमसर तालुक्यात कोसळला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर तुमसर तालुक्यात नाल्याच्या पुरामुळे हा महामार्ग सकाळपासून ठप्प झाला आहे. यासोबतच मोहाडी ते बालाघाट हा राज्य महामार्गही बंद आहे. जिल्ह्यातील तब्ब्ल ७२ ग्रामीण मार्ग बुधवारी सकाळपासून बंद झाले आहे.

मोहाडी शहराजवळील नाल्याला आलेल्या पुराने मोहाडी ते तुमसर हा रस्ता बंद पडला असून मोहाडी येथील १७ कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. भंडारा शहरातील सखल भागातील अनेक घरात पाणी शिरले असून जिल्ह्यातील नदी-नाल्याकाठावरील गावांमध्येही पुराचे पाणी शिरले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाच्यावतीने घराचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यानंतरच नेमके किती नुकसान झाले याची माहिती कळणार आहे.

गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडलेगोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ६७७८.२७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाणीपातळी वाढल्यास १२ हजार ते १६ हजार क्युसेक्सपर्यंत पाणीपातळी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :floodपूर